प्रदूषणमुक्तीवर महामेट्रोचा भर; मेट्रो स्टेशनवर सायकलसाठी असणार स्वतंत्र पार्किंग

राजेश प्रायकर 
Sunday, 25 October 2020

मेट्रोचा जास्तीत जास्त वापर नागपूरकरांनी करावा, यासाठी महामेट्रोने अनेक योजना पुढे आणल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत, कोव्हीडच्या काळात नागपूकरांनी आरोग्याच्या दृष्टीने सायकल वापरण्यास सुरुवात केली.

नागपूर ः सौर उर्जेचा ६५ टक्के वापर करून प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या महामेट्रोने आतापर्यंत सुरू करण्यात आलेल्या १६ स्टेशनवर सायकलसाठी स्वतंत्र पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली. सौर उर्जेनंतर सायकलला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र पार्किंग सुविधेवर भर देत महामेट्रोने नागपूरकरांच्या आरोग्यदायी प्रवासाचा मार्ग मोकळा केला.

तुम्ही रात्री घरात येणाऱ्या हिरव्या किड्यांनी त्रस्त आहात; मग ही बातमी तुमच्यसाठीच

मेट्रोचा जास्तीत जास्त वापर नागपूरकरांनी करावा, यासाठी महामेट्रोने अनेक योजना पुढे आणल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत, कोव्हीडच्या काळात नागपूकरांनी आरोग्याच्या दृष्टीने सायकल वापरण्यास सुरुवात केली. तरुण, तरुणी तर सायकलिंगच्या प्रेमात पडले. नागरिकांचे सायकलवरील प्रेम कायम राहावे, यासाठी महामेट्रोने हिंगणा तसेच वर्धा मार्गावरील सुरू असलेल्या १६ स्टेशनवर सायकलसाठी स्वतंत्र पार्किंग उपलब्ध करून दिली आहे. 

संपूर्ण स्टेशनवर ४१५ सायकल पार्क करता येणार आहे. सायकलाच्या वापरामुळे इंधनाची बचत तसेच प्रदूषणात घट होणार आहे. मेट्रोने काही स्टेशनवर प्रवाशांना कार्यालय तसेच घरी जाण्यासाठी सायकलही भाड्याने उपलब्ध करून दिल्या आहे. केवळ सायकलच नव्हे तर दुचाकी तसेच कारसाठीही पार्किंगची सुविधा आहे.

बापरे बाप! .चोरट्यांनी केला चक्क वाइनशॉपीत डान्स; असे काय दिसले झाला इतका आनंद

अपंगांच्या वाहनांसाठीही जागा आरक्षित

महामेट्रोने अपंगचा मेट्रोमधील प्रवास सुसह्य करण्यासाठी लिफ्टची सोय करून दिली आहे. अपंगांना लिफ्टमधून थेट प्लॅटफॉर्मवर पोहोचता येणार आहे. अपंगांच्या वाहनांसाठी स्टेशनवर जागा आरक्षित करण्यात आली आहे. सर्वच स्टेशनवर अपंगाच्या वाहनांसाठी १८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: extra parking for cycles at metro station in Nagpur