वाहतूक पोलिस शाखेत दुफळी?, अवैध वाहतूक सुसाट; डीसीपींनी लक्ष देण्याची गरज

Faction in traffic police branch Nagpur traffic police news
Faction in traffic police branch Nagpur traffic police news

नागपूर : शहर वाहतूक पोलिस दलात पोलिस अधिकाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. काही ‘वजनी’ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शहरातील अवैध वाहतूक सुसाट सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

शहर वाहतूक पोलिस विभागात दहा झोन निर्माण करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेची धुरा सक्षम अधिकारी सारंग आवाड यांच्या हाती देण्यात आली आहे. त्यांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीला नीट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, वाहतूक शाखेतील काही पोलिस अधिकारी गटबाजी करीत पोलिस उपायुक्तांना योग्य माहिती न देता दिशाभूल करीत असल्याची चर्चा आहे.

वाहतूक शाखेतील काही वादग्रस्त अधिकाऱ्यांमुळे वाहतूक शाखेतील वातावरण गढूळ झाले आहे. पोलिस उपायुक्तांच्या नजरेआड काही अधिकाऱ्यांनी वाळू वाहतूक, प्रवासी वाहने, खासगी बसेस आणि अवैध प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 

वरिष्ठ निरीक्षकांचे दुर्लक्ष

गीतांजली चौक, कॉटनमार्केट, गणेशपेठ, सीताबर्डी, धंतोली या परिसरात दुपारी खासगी बसेसला शहरात थांबे किंवा प्रवासी भरण्याची मनाई असतानासुद्धा पोलिसांच्या आशीर्वादाने हे सुरू आहे. इंदोरा, कामठी, लकडगंज या परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहतूक करण्यात येत आहे. याकडे पोलिस निरीक्षकांनी सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसते. डिप्टी सिग्नल रेल्वे क्रॉसिंग परिसरात साडेनऊ वाजताची ड्यूटी असतानासुद्धा वाहतूक कर्मचारी सकाळी सहा वाजतापासूनच ‘कर्तव्य’ बजावण्यासाठी तत्पर असतात, अशी चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com