१०० कोटींच्या 'सुपर' शायनिंगची घोषणा फोल, तत्कालीन फडणवीस सरकारने दिला नाही रुपया

केवल जीवनतारे
Tuesday, 19 January 2021

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गरिबांच्या ह्दयापासून तर किडनी आणि मेंदूवरील उपचारात वरदान ठरले आहे. मध्य भारतातील ३० टक्के रुग्ण सुपरमध्ये उपचारासाठी येतात.

नागपूर : तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी १०० कोटी खर्चून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची श्रेणीवर्धन करण्याची घोषणा २०१७ मध्ये केली होती. २०१९ पर्यंत सत्तेवर फडणवीस सरकार होते. या कालावधीत एक रुपयादेखील सुपरला दिला नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. 

हेही वाचा - गृहिणींनो, सोयाबीन तेलाच्या भावात घसरण, साखरेबाबतही गोड बातमी

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गरिबांच्या ह्दयापासून तर किडनी आणि मेंदूवरील उपचारात वरदान ठरले आहे. मध्य भारतातील ३० टक्के रुग्ण सुपरमध्ये उपचारासाठी येतात. सुपरचे श्रेणीवर्धन करण्यासंदर्भात सुपर स्पेशालिटीचे तत्कालीन विशेष कार्य अधिकारी डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी आराखडा तयार केला होता. सुपर स्पेशालिटीचे 'व्हीजन-२०२२' तयार केले होते. हे व्हीजन बघता यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी १०० कोटीतून सुपरचे श्रेणीवर्धन करण्याची घोषणा केली. या १०० कोटीतून ५० कोटी बांधकामावर खर्च करण्यात येणार होते, तर दरवर्षी यंत्र खरेदीवर ५ कोटी खर्च करण्यात येणार होते. तसे पत्र मेडिकल-सुपरमध्ये पोहोचले होते. 'सुपर' शायनिंगची घोषणा झाल्यानंतर काही दिवसातच डॉ. श्रीगिरीवार यांची बदली झाली आणि फडणवीस यांनी १०० कोटींचा निधी आगामी पाच वर्षात सुपरच्या श्रेणीवर्धनासाठी देण्यात येईल, ही अंमलबजावणी थांबली. 

हेही वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी कॉलेज कौन्सिलमध्ये १०० कोटीतून होणाऱ्या विकासाचा विषय हाताळला होता. मुख्यमंत्री सहायता निधीतून पहिल्या वर्षी २० कोटी मिळणार होते. ते मिळाले नाही. यानंतर दरवर्षी २० कोटी मिळणार होते. दरवर्षी, मिळणाऱ्या २० कोटीतून प्रत्येक वर्षी १० कोटी बांधकामावर, तर ५ कोटी यंत्र खरेदीवर तर ५ कोटी इतर सेवांवर खर्च करण्यात येतील, अशी सूचना या पत्रात नमूद होती. परंतु, १०० कोटींचा निधी अखेरपर्यंत कागदावरच राहिला. 

हेही वाचा - प्रेमासमोर जन्मदात्याचा विसर! 'प्लीज पप्पा, तक्रार नका देऊ न' असं म्हणत चाकूहल्ला...
 
१०० कोटीतून पाच वर्षात ५० कोटींचे बांधकाम, २५ कोटींचे यंत्र तर २५ कोटी इतर सेवांवर खर्च करण्यात येणार होते. २०१७ साली केलेल्या घोषणेनंतर २ वर्षे सत्तेवर असूनही फडणवीस सरकारने दिली नाही. या निधीमुळे सुपरच्या विकासात्मक कामांना हातभार लागणार होता. महाविकासआघाडी सरकारने ही मागणी आता पूर्ण करावी. 
-त्रिशरण सहारे, अध्यक्ष, विदर्भ आरोग्य सेवा वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटना, नागपूर. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fadnavis government did not give money to super specialty hospital development in nagpur