esakal | अतिपावसाने कपाशी, सोयाबीनचे पीक झाले खराब म्हणून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer commits suicide by jumping into a well

भोजराज इंगोले सोमवारी सकाळी आपल्या शेतात गेले असता होमराज गंगाधर चरपे यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

अतिपावसाने कपाशी, सोयाबीनचे पीक झाले खराब म्हणून शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

sakal_logo
By
अतुल दंढारे

मेंढला (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यातील मेंढला येथील होमराज गंगाधर चरपे (वय ३३) या शेतकऱ्याने गावालगतच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

होमराज चरपे यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. अतिपावसाने कपाशी व सोयाबीन पीक खराब झाले होते. तसेच हाताला काम नसल्याने ते नेहमी चिंताग्रस्त राहायचे, असे सांगण्यात येते. शनिवारी (ता. १०) रात्री चार वाजता ते अचानक घरून निघून गेले. रविवारी दिवसभर त्यांचे वडील, दोन भाऊ यांनी परिसर पिंजून काढला; परतु ते कुठेही दिसून आले नाही.

ठळक बातमी -  मुलाला असलेले मोबाईलचे वेड बेतले वडिलांच्या जीवावर; कुटुंबातील कर्त्या पुरुषाने उचलले टोकाच पाऊल

भोजराज इंगोले सोमवारी सकाळी आपल्या शेतात गेले असता होमराज गंगाधर चरपे यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. आर्थिक विवंचनेमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व चार वर्षांचा मुलगा आहे. तपास जलालखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक डेकाटे, उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संजय इंगोले, शिपाई शरद घोरमाडे करीत आहेत.

घरावर दगडफेक, न्यू कैलासनगरमध्ये तणाव

विक्की अनिल पसेरकर (वय २८) व सौरभ याच्यात वाद सुरू आहे. रविवारी रात्री सौरभ व त्याचे साथीदार विक्कीच्या घरी आले. त्यांनी लोखंडी रॉडने विक्कीवर हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी विक्की छतावर गेला. सौरभ व त्याचे साथीदारही छतावर आले. जीव वाचविण्यासाठी विक्कीने छतावरून उडी घेतली. यात विक्कीच्या पायाला मार लागला. तर सौरभ याची आई सुनीता विलासराव अल्डक (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सौरभचा लहान भाऊ क्षितिज याचा वाढदिवस होता. रात्री विक्की व त्याचे दोन साथीदार घराजवळ आले. शिवीगाळ करून त्यांनी घरावर दगडफेक केली. सौरभ व कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. अल्डक यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी विक्की व त्याच्या साथीदाराविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी

पाच लाखांनी फसवणूक

मोबाईलवरील बंद झालेले मॅसेज सुरू करण्याच्या बहाण्याने ५० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची चार लाख ९७ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. २७ ऑगस्टला दुपारी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर सायबर गुन्हेगाराने संपर्क साधला. तुमच्या मोबाइलवरील मॅसेज बंद करण्यात आले आहेत. ते सुरू कराण्यासाठी एटीएमचा क्रमांक व पीनकोड सांगा, असे गुन्हेगार म्हणाला. ज्येष्ठ नागरिकाने त्याला पिनकोड व क्रमांक दिला. गुन्हेगाराने ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून चार लाख ९७ हजार ५०० रुपये स्वत:च्या खात्यात वळते केले.

संपादन - नीलेश डाखोरे

go to top