अन्‌ तृतीयपंथीयांच्या दोन गटात झाला राडा

file
file
Updated on

वाडी (जि.नागपूर)  : वाडी पोलिस ठाण्यासमोरील प्रवेशद्वारासमोरच शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास तृतीपंथीयात परस्परातील वादातून मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. सात) घडला. त्यांच्यातील भांडण बघण्यासाठी दोन्ही बाजूंनी वाहन थांबवून चालकांनी गर्दी केली. अनेकांनी धिंगाणा पाहून नाराजी व्यक्त केली.

वाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी तृतीयपंथीय तमन्ना ऊर्फ तात्या विंचू (वय 25, रा. मोतीबाग, नागपूर) या तृतीयपंथीयाने तक्रार नोंदविली की गुरुवारी गोंडखैरी टोलनाक्‍यावर तृतीयपंथीयांच्या दुस-या गटातील हसीना शहानाज शहा (वय 25, मरियमनगर, नागपूर) या तृतीयपंथीयाने पहिल्या गटातील सदस्यांना बिदागी मागण्यावरून मारहाण केली. या विरोधात कळमेश्वर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी दोन्ही गटांतील सदस्य समेट घडवून आणण्यासाठी वाडी पोलिस ठाण्यासमोरील चहाटपरीवर पोहोचले व समझोता करीत असतानाच पुन्हा वादाला बिंग फुटले.

"लाइव्ह' मारहाण
काही वेळातच दोन्ही गटांत भररस्त्यावर हाणामारी सुरू झाली. परस्परांना अश्‍लील शिवीगाळ, हातवारे यासह प्रत्यक्षात एका सदस्याने चक्क अंगावरील कपडे उतरवून धिंगाणा सुरू केला. ही हाणामारी सुरू झाली असताना रस्त्यावरील वाहनचालकांनी वाहने थांबवून या "लाइव्ह' मारहाणीचा आनंद घेतला. काही नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हॉट्‌सऍपवर प्रसारित केला. हा प्रकार वाडी पोलिस ठाण्यासमोरच घडल्याने कर्तव्यावर तैनात अधिकारी पोलिस उपनिरीक्षक कावनापुरे यांनी सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही गटाच्या तृतीयपंथींना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

दोन्ही गटांची एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार
या प्रकरणात हसीना शहा या तृतीयपंथीयाच्या तक्रारीवरून ऐश्वर्या गुरू शबाना खान (वय 20), संजिता खान (वय 36), चेंड्री राधिका खान (वय 20) या तृतीयपंथीयावर तर ऐश्वर्या गुरू शबाना खानच्या तक्रारीवरून साक्षी शहनाज शाहा, हसीना शहनाज शहा, सुहाना गुरू साक्षी शहा (वय 31, सर्व रा. मरियमनगर) यांच्याविरोधात वाडी पोलिसांनी दोन्ही गटातील सदस्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कावनापुरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com