अधिक गस्त वाढवण्यासाठी पोलिस दलात फ्रीगो पोलिस वाहन रूजू ; गृहमंत्री अनिल देशमुखांची उपस्थिती 

अनिल कांबळे 
Sunday, 13 December 2020

पोलिस जिमखाण्यात आज शनिवारी रात्री आठ वाजता फ्रीगो वाहनाचा उद्धाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आली होताता. नागपूर शहर पोलिस दलात फ्रीगो पोलिस वाहन रूजू झाले आहेत. या वाहनांचा आजपासून वापर करण्यात येईल

नागपूर ः पोलिसांच्या गस्तप्रणालीमुळे ‘व्हीजीबल पोलिसींग’ होत असल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण होते तर गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये दहशत निर्माण होते. पोलिसांची गस्त अधिक चांगल्याप्रकारे सुलभ आणि सोपी व्हावी, यासाठी नागपूर शहर पोलिस दलाला १० फ्रीगो टू व्हीलर सेल्फ बॅलन्सींग स्कूटर देण्यात आली आहेत. सध्या दहा वाहने देण्यात आले असून काही दिवसांतच वाहनांची संख्या ५० पर्यंत नेण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. ते यावेळी पोलिस जिमखाण्यात आयोजित फ्रीगो वाहनाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. 

क्लिक करा - दानवेंची जीभ कापणार्‍यास दहा लाख आणि बारा लाखांचे वाहन; शिवसेना संपर्क प्रमुखांची खळबळजनक घोषणा

पोलिस जिमखाण्यात आज शनिवारी रात्री आठ वाजता फ्रीगो वाहनाचा उद्धाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आली होताता. नागपूर शहर पोलिस दलात फ्रीगो पोलिस वाहन रूजू झाले आहेत. या वाहनांचा आजपासून वापर करण्यात येईल. पोलिसांच्या आधुनिकिरणाचा प्रयत्न गृहमंत्रालय करीत आहेत. सध्या मुंबईत ५० फ्रीगो वाहनांनी पोलिस गस्त घालत आहेत. 

या वाहनामुळे पोलिसांना गस्त घालण्यास सुलभ होत आहे. फ्रीगो वाहनांना हिरवी झेंडी दाखवून गृहमंत्र्यांनी उद्घाटन केले. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. पोलिस कर्मचाऱ्यांनी फ्रीगो वाहनावरून ना. देशमुख यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाला पोलिस दलातील तीनही अतिरिक्त आयुक्त, सर्वच पोलिस उपायुक्त उपस्थित होते.

हेही वाचा -दानवे भैताड माणूस, वडेट्टीवारांची जीभ घसरली 

फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, वॉकर स्ट्रीट, सिव्हिल लाइन्स आदी भागांत या वाहनांद्वारे गस्त घालण्यात येईल. पोलिस विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अत्याधुनिक ड्रोन, सीसीटीव्ही आदींसह अत्याधुनिक साधने पोलिस विभागाला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याचा वापर पोलिसांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी करावा. ‘क्राइम कंट्रोल’साठी या वाहनांचा उपयोग होईल, असेही ते म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Figro vehicle joined in maharashtra police