
सूर्यकांत यांचा राशीचे रत्न विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे लहान बंधून महेंद्र हे योग प्रशिक्षक असून ते इटलीत राहतात. २०१६ मध्ये दोघांना फ्लॅट खरेदी करायचा होता. यादरम्यान जयपुरीया यांच्या कोका कोला फॅक्टरी चौकात इंद्रिको अपार्टमेंटचे बांधकाम सुरू होते.
नागपूर : विक्रीचा व्यवहार करूनही पेंटहाऊस न विकता फसवणूक केल्याचा प्रकार वर्धा मार्गावरील कोका-कोला फॅक्टरी चौकात घडला आहे. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी प्रसिद्ध बिल्डर वैभव जयपुरीया व व्यवस्थापकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. संजय कौल, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. सूर्यकांत साहेबराव सिरसाठ (वय ४८ रा. सोमलवाडा) यांच्या तक्रारवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा - जागतिक एड्स दिवस : प्रथमच घटला एचआयव्हीग्रस्तांचा आकडा...
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यकांत यांचा राशीचे रत्न विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांचे लहान बंधून महेंद्र हे योग प्रशिक्षक असून ते इटलीत राहतात. २०१६ मध्ये दोघांना फ्लॅट खरेदी करायचा होता. यादरम्यान जयपुरीया यांच्या कोका कोला फॅक्टरी चौकात इंद्रिको अपार्टमेंटचे बांधकाम सुरू होते. दोघांनी जयपुरीया यांच्या कार्यालयात संपर्क साधला. जपुरीया व कौल यांनी दोघांना पेंटहाऊसबाबत माहिती दिली. पाच हजार चौरसफुट बांधकाम असलेल्या पेंटहाऊसचा प्रतिचौरसफुट सहा हजार रूपये, असा दर निश्चित करण्यात आला. त्यांनी जयपुरीयांना २० लाखांचा धनादेश व २५ हजार युरो अर्थात २५ लाख रूपये दिले. त्यानंतर दर तिसऱ्या महिन्यात दहा लाख रुपये जमा करण्याचा करार करण्यात आला.
हेही वाचा - सोयाबीनचे दर वधारले; उच्च दर्जाच्या सोयाबीनला हमीदरापेक्षा कमी भाव
२०१७ मध्ये सूर्यकांत यांनी ५० लाख रुपयांचा धनादेश दिला. पैसे जमा केल्यानंतरही जयपुरीया यांना पेंटहाऊसची विक्री करण्यास टाळाटाळ केली. या मोबादल्यात अन्य फ्लॅट देतो, अशी अट जयपुरीया यांनी सिरसाठ यांना घातली. ती सिरसाठ यांनी मान्य केली. यावरही त्यावेळेसच्या दरानुसार जयपुरीया यांनी पैशाची मागणी केली. सिरसाठ बंधूंनी पैसे परत मागितले. पैसे देण्यासही जयपुरीयाने नकार दिला. सिरसाठा यांनी पोलिस आयुक्त अमितशकुमार व अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप झळके यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर प्रतापनगर पोलिसांनी जयपुरीया व कौल या दोघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.