
धोरणात कृषिपंपांना २०० मीटरपर्यंत लघुदाब, २०० ते ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वाहिनीद्वारे नवीन वीजजोडणी, तर ६०० मीटरवरील कृषिपंप ग्राहकांना सौर कृषीपंपाद्वारे नवीन वीज जोडणी तसेच विद्यमान कृषिपंप ग्राहकांना पारेषण विरहित सौर कृषिपंप घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
नागपूर : नवीन कृषी धोरणात कृषिपंप ग्राहकांनी प्रथम वर्षी थकबाकी भरल्यास ५० टक्के अतिरिक्त सूट मिळणार असून, दुसऱ्या वर्षी भरल्यास ३० टक्के व तिसऱ्या वर्षी २० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. थकबाकी नसणाऱ्या व नियमित वीजबिल भरणाऱ्या कृषी ग्राहकांना या योजनेच्या कालावधीत चालू वीज बिलावर अतिरिक्त ५ टक्के सवलत मिळणार आहे.
हेही वाचा - मुलाला खटकले आईचे प्रेमसंबंध अन् उचलले धक्कादायक पाऊल, आईने काढली समजूत
या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसंदर्भात महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी विभागातील सर्व मुख्य अभियंते, अधीक्षक आणि कार्यकारी अभियंत्यांकडून शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. या धोरणात कृषिपंपांना २०० मीटरपर्यंत लघुदाब, २०० ते ६०० मीटरपर्यंत उच्चदाब वाहिनीद्वारे नवीन वीजजोडणी, तर ६०० मीटरवरील कृषिपंप ग्राहकांना सौर कृषीपंपाद्वारे नवीन वीज जोडणी तसेच विद्यमान कृषिपंप ग्राहकांना पारेषण विरहित सौर कृषिपंप घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
हेही वाचा - 'मेडीकल'समोरील दृश्य पाहून डॉक्टरांचेही पाणावले डोळे, पण बघ्यांच्या भूमिकेशिवाय काहीच...
नवीन कृषी धोरणात कृषी पंपधारक ग्राहकांना थकबाकीतून मोठा दिलासा मिळणार आहे. या धोरणात सहभागी होणाऱ्या सर्व कृषी ग्राहकांचा मागील ५ वर्षांपर्यंतच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब शुल्क आकार पूर्णपणे माफ करण्यात येऊन या थकबाकीवरील व्याज १८ टक्क्यांपर्यंत न आकारता वीज नियामक आयोगाने दिलेल्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारणी करून थकबाकी निश्चित केली आहे. तसेच पाच वर्षांपूर्वीच्या म्हणजेच सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील विलंब आकार व व्याज १०० टक्के माफ करून केवळ मूळ थकबाकीच वसुलीसाठी ग्राह्य धरण्यात आली आहे.
हेही वाचा - दोघांनीही बघितले सुखी संसाराचे स्वप्न, पण एक व्यसन लागलंय अन् सर्वच संपलं
थकबाकी वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतीला वीज बिल भरणा केंद्र म्हणून प्रतिवीज बिल वसुलीसाठी पाच रुपये, थकबाकी वसूल केल्यास वसूल केलेला थकबाकीच्या ३० टक्के रक्कम तसेच चालू वीजबिल वसूल केल्यास वसुली रकमेच्या २० टक्के मोबदला देण्यात येणार आहे.