महामेट्रो जोमात! देशात प्रथमच 'फ्लोटिंग ट्रॅक'चा होणार वापर; झिरो माईल स्टेशनवर प्रयोग 

Floating track will be use in metro first experiment in India
Floating track will be use in metro first experiment in India

नागपूर :  कमी वेळात मेट्रो सुरू करून देशात मान उंचावणाऱ्या महामेट्रोने आणखी एक प्रयोग मेट्रो स्टेशनवर करीत देशाचे लक्ष वेधले. मेट्रो प्रकल्पातील पहिलाच फ्लोटिंग ट्रॅक स्लॅबचा वापर करीत देशातील इतर मेट्रो प्रकल्पासाठी सुकर मार्ग तयार केला. कंपने टाळण्यासाठी झिरो माईल मेट्रो स्टेशनच्या फ्लोटिंग ट्रॅक स्लॅबवर मास स्प्रिंग प्रणाली बसविण्यात आली.

मेट्रोचे झिरो माईल स्टेशन स्थापत्य कलेचे अद्भुत उदाहरण आहे. या स्टेशनला कंपनाचा त्रास होऊ नये, यासाठी व्हायाडक्टवर फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब टाकण्यात आले. त्यावर मास स्प्रिंग प्रणाली बसविण्यात आली. अशी यंत्रणा बसविणारा नागपूर मेट्रो प्रकल्प देशातील पहिलाच आहे. 

झिरो माईल मेट्रो स्टेशन येथे इमारतीच्या आतमधून मेट्रोचे रेल्वे ट्रॅक आहे. त्यामुळे मेट्रोच्या वेगाने इमारत कंपनामुळे हादरण्याची शक्यता आहे. परिणामी प्रवाशांत भीतीची निर्माण होऊ शकते. त्यामुळे ही यंत्रणा बसविण्यात आली. इतर मेट्रो स्टेशनवर ट्रॅक व स्टेशन वेगवेगळ्या मजल्यावर असल्याने तेथे या प्रणालीची गरज नसल्याचेही महामेट्रोने स्पष्ट केले. 

मेट्रो स्टेशनवरील ट्रॅक स्ट्रक्चरची रचना फ्लोटिंग स्लॅबप्रमाणे करण्यात आली आहे. या ठिकाणी काँक्रीटचे संपूर्ण स्लॅब संलग्न असून यामध्ये कुठल्याही प्रकारचे जॉइंट नाही. क्रोम अलॉयड स्टील स्प्रिंग सिस्टम ट्रेनच्या हालचाली दरम्यान तयार होणारी कंपन कमी करते. मास स्प्रिंग सिस्टम हे एका प्रकारे मेंटेनन्स फ्री सिस्टम असून ७५ वर्षांपर्यंत ते काम करीत राहणार आहे. झिरो माईल स्टेशन बहुमजली वाणिज्यिक इमारत असून याठिकाणी भूमिगत मल्टी लेवल पार्किंगची व्यवस्था करण्यात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com