किंचित दिलासा... या जिल्ह्यात तब्बल चाळीस हजार लोकांनी केली कोरोनावर मात

Monday, 14 September 2020

प्टेंबरच्या १४ दिवसांमध्ये २३ हजार ९१८ कोरोनाबाधित आढळून आले. तर यातील ६५५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूसह बाधितांमध्ये होत असलेली विक्रमी वाढ ही अतिशय धोकादायक आहे. यामुळे नागपूरचे प्रशासन हादरले आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या शासकीय आरोग्य यंत्रणांची मर्यादा स्पष्ट झाली आहे.

नागपूर : नागपुरात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांच्या संख्येत अचानक रविवारच्या तुलनेत पन्नास टक्के घट झाली. तर कोरोनावर मात करणाऱ्यांचा टक्का वाढला. १००२ रुग्णाची भर पडली. तर १५१८ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यत ५३ हजार ४७३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ४० हजार ६६७ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र कोरोनाच्या मृत्यूचा कहर मात्र सुरूच आहे. सोमवारी ४५ कोरोना बळी गेल्यामुळे मृत्यूचा आकडा १७०२ वर पोहचला. तर आजच्या घडीला नागपुरात ११ हजार १०४ कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

सप्टेंबरच्या १४ दिवसांमध्ये २३ हजार ९१८ कोरोनाबाधित आढळून आले. तर यातील ६५५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूसह बाधितांमध्ये होत असलेली विक्रमी वाढ ही अतिशय धोकादायक आहे. यामुळे नागपूरचे प्रशासन हादरले आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या शासकीय आरोग्य यंत्रणांची मर्यादा स्पष्ट झाली आहे. मात्र तरीदेखील गरीबांच्या मदतीला मेडिकल आणि मेयो रुग्णालयातील डॉक्टर परिचारिका धावून येत आहेत. 

महत्त्वाची बातमी - अरे हे काय... सोन्याचे भाव घटले, तरीही ग्राहक फिरकेना, या महिन्यात दरवाढ होण्याचे संकेत
 

नागपुरात सद्या मेयो, मेडिकल, लता मंगेशकर रुग्णालयासह जिल्ह्यातील ६० कोविड रुग्णालयात ४ हजार ५१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर होम क्वारंटाईनमध्ये ६६७५ कोरोनाबाधित आहेत. सोमवारी एम्समध्ये केवळ १९८ चाचण्या झाल्या. यापैकी ९८ जण कोरोनाबाधित आढळून आले. तर मेडिकलमध्ये ५६२ तर मेयो रुग्णालयात ४८८ चाचण्या झाल्या आहेत. मेयो आणि मेडिकलमध्ये सोमवारी प्रत्येकी १४१ रुग्ण आढळून आले आहेत. 

खासगी प्रयोगशाळेत ६७३ नमुने तपासण्यात आले असून, यातील २२३ जण बाधित आढळले. दोन महिन्यांपासून खासगीतील नमुने तपासणीचा टक्का वाढला आहे. मेडिकलमध्ये २४ तासांमध्ये २० तर मेयोत १९ जण कोरोनाच्या बाधेने दगावले आहेत. उर्वरित ६ मृत्यू  खासगी रुग्णालयात झाले असून, दोन महिन्यांत खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान दगावणाऱ्यांची संख्या २०२ वर पोहचली आहे.  

क्लिक करा - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..
 

चाचण्यांचा टक्का घसरला

सोमवारी (ता.१४) नागपुरातील चाचण्यांचा टक्का पन्नास टक्के घसरला. यामुळे कोरोनाबाधितांच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून आले. दोन दिवसांपूर्वी नागपुरात चाचण्यांची संख्या १० हजारांच्या जवळपास पोहचली होती. मात्र, सोमवारी अवघ्या ४ हजार ६३३ चाचण्या झाल्या. यात १००२ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५३ हजार ४७३ वर पोहचली आहे. 

कोरोनामुक्तीचा टक्का वाढला

सरकारी रुग्णालयात होत असलेल्या उपचारामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. महिनाभरापूर्वी ४६ टक्क्यांपर्यंत रुग्ण बरा होण्याचा दर घसरला होता. परंतु, महिनभरानंतर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तब्बल ३० टक्क्यांनी बरा होण्याचा दर वाढल्यामुळे प्रशासनासाठी ही बाब दिलासादायक आहे. सद्या कोरोनामुक्तीचा दर ७६ टक्क्यांवर पोहचला आहे.

असे आहेत मृत्यू 

  • मेडिकल    - ८२४
  • मेयो        - ६७५
  • खासगी रुग्णालय -२०२
  • एम्स       - १

 

  • जिल्ह्यात सहा महिन्यांत ३ लाख ५८ हजार २७६ चाचण्या
  • जिल्ह्यात सोमवारी ४ हजार ६३३ चाचण्या
  • सोमवारी मेडिकलमध्ये २०, मेयोत १९ तर खासगीत ६ मृत्यू
  • जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ७६ टक्क्यांवर 

    संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forty thousand people in Nagpur district recovered from corona disease