कडकनाथ कोंबड्यांच्या नावावर शेतकऱ्यांची फसवणूक, मोठ्या आर्थिक लाभाचे आमिष 

 Fraud of farmers in the name of Kadaknath hens
Fraud of farmers in the name of Kadaknath hens

नागपूर  : सध्या कडकनाथ कोंबड्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. या कोंबड्यांच्या मांसात औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे महाग असूनही या कोंबड्यांना चांगली मागणी आहे. कुक्कुटपालन करणाऱ्यांचा कल कडकनाथ कोंबड्या पाळण्याकडे असल्याने फसवणूकीचे प्रकार वाढले आहेत. 

सांगलीतील दोन आरोपींनी कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायद्याचे प्रलोभन देऊन ११० शेतकऱ्यांची लाखो रूपयांनी फसवणूक केली. आरोपींनी शेतकऱ्यांना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून फसविल्याप्रकरणी क्राईम ब्रॅंचने गुन्हे दाखल केले आहेत. सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते (दोन्ही रा. सांगली) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. आरोपी हे महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रा. लिमी.चे संस्थापक व संचालक आहेत.

विकास बलवंतराव मेश्राम (रा. गुमथळा ता. कळमेश्वर) असे फसवणूक झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. विकास मेश्राम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ८ मे २०२0 रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. महारयत अ‍ॅग्रोचे संस्थापक सुधीर व संचालक संदीप तसेच इतर आरोपींनी शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात मोठया प्रमाणात आर्थिक फायद्याचे प्रलोभन दिले. आरोपींनी ११0 शेतकऱ्यांकडून मेश्राम यांच्यासह एकूण १६ लाख ४९ हजार ५६0 रुपये घेतले. 

तसेच आरोपींनी केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीचे पालन न करता शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल त्यांनी स्वत:कडे असणाऱ्या कागदपत्रांसह पोलिसांसोबत संपर्क साधावा. त्यामुळे आरोपींविरूध्द पुढील कारवाई करता येईल. 

आरोपींविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळाली आहे. आरोपी हे गुंतवलेली रक्कम परत करण्यास नकार देत असून त्यांनी अफरातफर केली आहे. त्यामुळे गुंतवणुक करणाऱ्या नागरिकांनी पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, प्रशासकीय इमारत क्र.१, सिव्हील लाइन्स , नागपूर शहर येथे पोलिस निरीक्षक मीना जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com