नऊ हजारांचे जलशुद्धीकरण विभागाने खरेदी केले चाळीस हजारांत, धोळ करण्याची स्पर्धा...

नीलेश डोये
Tuesday, 4 August 2020

मंजुरी मिळताच त्याच दिवशी सर्व कार्यवाही पार पाडून ७५ जलशुद्धीकरण, ६० संगणक, ६० एलईडी टिव्ही, ६० प्रोजेक्टरचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ५० लिटर जलशुद्धीकरण केटीइएन कंपनीचे ३९ हजार ९०० रुपये, फिलीप्स कंपनीची एलईडी टिव्ही ३२ इंच ४९ हजार ८००, व्ह्युवसॉनिक कंपनीचे प्रोजेक्टर ४४ हजार ७२०, एचपी ३ प्रो संगणक ४९ हजार ९०० रुपयांमध्ये खरेदी केल्याची लेखी माहिती विभागाने दिली.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जल शुद्धीकरण, एलईडी टिव्ही, प्रोजेक्टर व संगणकांची खरेदी करण्यात आली. या खरेदीत तब्बल ५९ लाख ७ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप शिक्षण समिती सदस्य राजेंद्र हरडे यांनी पत्रपरिषदेत केला. बाजारात ९ हजारात उपलब्ध असलेले जलशुद्धीकरण विभागाने ४० हजारात खरेदी केल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी हरडे यांनी केली.

जि.प.च्या शिक्षण विभागाने ३१ मार्च रोजी सेस फंड योजना २०१९-२० अंतर्गत साहित्य खरेदीच्या प्रस्तावास मान्येता करिता तातडीने सभा बोलावली. त्यात जल शुद्धीकरण, एलईडी टिव्ही, प्रोजेक्टर व संगणक प्रत्येकी ३० लाख प्रमाणे खरेदी करण्याचे नियोजित होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभरात टाळेबंदी होती. निधी परत जाण्याचे कारण सांगून विभागाने तात्काळ मंजुरी देण्याची विनंती सदस्यांना केली.

हेही वाचा - हे काय, तुकाराम मुंढे यांच्या घरावर धडकले नागरिक, काय असेल कारण...

मंजुरी मिळताच त्याच दिवशी सर्व कार्यवाही पार पाडून ७५ जलशुद्धीकरण, ६० संगणक, ६० एलईडी टिव्ही, ६० प्रोजेक्टरचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. ५० लिटर जलशुद्धीकरण केटीइएन कंपनीचे ३९ हजार ९०० रुपये, फिलीप्स कंपनीची एलईडी टिव्ही ३२ इंच ४९ हजार ८००, व्ह्युवसॉनिक कंपनीचे प्रोजेक्टर ४४ हजार ७२०, एचपी ३ प्रो संगणक ४९ हजार ९०० रुपयांमध्ये खरेदी केल्याची लेखी माहिती विभागाने दिली.

परंतु, या वस्तूंचे बाजारात दर वेगळे आहेत. आपण स्वत: त्याच कंपनीचे जलशुद्धीकरण खरेदी केले असता प्रति नग ९ हजार ३१० मध्ये प्राप्त झाले. एलईडी टीव्ही १५ हजार ७०० रुपये, प्रोजेक्टर ३० हजार ५०० रुपये, संगणक ३८ हजार या दरात उपलब्ध असून आपल्याकडे त्याची बिल असल्याचा दावा त्यांनी केला.

अधिक माहितीसाठी - आयुक्त मुंढे व लोकप्रतिनिधी वादावर काय म्हणाले फडणवीस? वाचा

न्यायालयात जाणार
सर्वसाधारण सभेत विषय उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु पिठासिन अध्यक्षांनी विषय मांडू दिला नाही. जीईएम पोर्टलवरून खरेदी केल्याने ते योग्य असल्याचे अध्यक्ष म्हणाले होते. हा मोठा घोटाळा आहे. सत्ताधारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालीत आहेत. योग्य चौकशी न झाल्यास उच्च न्यायालयासह राज्यपालांकडेही दाद मागू, असे विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fraud in item purchase in jilha parishad