esakal | "दारू तर पाजली पण अंडाकरी दिलीच नाही" म्हणून केला मित्राचा खून; बनारसी हत्याकांडाचे रहस्य अखेर उलगडले
sakal

बोलून बातमी शोधा

friend took ectreme step as man refuses to give anda curry

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री मानकापूर पोलिसांना माहिती मिळाली एक युवक गोधणी रोडवर श्रीकृष्ण ऑटो गॅरेजच्या बाजूला जखमी अवस्थेत पडून आहे

"दारू तर पाजली पण अंडाकरी दिलीच नाही" म्हणून केला मित्राचा खून; बनारसी हत्याकांडाचे रहस्य अखेर उलगडले

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर ः दारू आणि अंडाकरीचा बेत आखल्यानंतर जेवण बनविण्यास नकार दिल्यामुळे युवकाने मित्राचा दगडाने ठेचून खून केला. असा थरारक उलगडा बनारसी हत्याकांडातील आरोपीने केला असून पोलिसही अवाक झाले आहेत. शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला मानकापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गौरव उर्फ निक्की शैलेंद्र गायकवाड (म्हाडा क्वॉटर्स, पिटेसूर रोड, गोधनी रेल्वे) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री मानकापूर पोलिसांना माहिती मिळाली एक युवक गोधणी रोडवर श्रीकृष्ण ऑटो गॅरेजच्या बाजूला जखमी अवस्थेत पडून आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पोहाेचून जखमीला उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. परीसरात चौकशी केली असता त्याचे नाव बनारसी असल्याचे समजले. 

सविस्तर वाचा - घरात अचानक जाणवू लागली प्रचंड उष्णता; कारण कळताच कुटुंबाने पहिल्या माळ्यावरून घेतल्या उड्‌या

पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले तसेच बनारसीबाबत माहिती काढली. बनारसी आणि आरोपी निक्की यांची मैत्री होती. निक्की हा कुख्यात असून त्याच्यावर २०१७-१८ मध्ये तो दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. 

बनारसीला होते दारूचे व्यसन 

बनारसी हा मजूर असून त्याला दारूचे व्यसन होते. बनारसीने शुक्रवारी रात्री दारू आणि अंडाकरी बनविण्याचा बेत आखला. त्याने आरोपी निक्कीला जेवणाचे निमंत्रण दिले. त्यानुसार निक्की आणि बनारसी दोघेही रात्री साडेदहा वाजेपर्यंत दारू पित बसले. दोघांनाही भूक लागली. निक्कीने अंडाकरीबाबत विचारणा केली असता बनारसीने बनविली नसल्याचे सांगितले. 

त्याला अंडाकरी बनविण्यास सांगितले असता त्याने उकळलेले अंडे खाऊन घेतल्याचे सांगितले. त्यामुळे चिडलेल्या निक्कीने बनारसीला दांड्याने मारहाण केली. त्याचा पारा एवढा चढला की त्याने बनारसीचा दगडाने ठेचून खून केला. ठाणेदार गणेश ठाकरे, क्रीष्णा शिंदे, पीएसआय कैलास मगर, युवराज सहारे, अमित मिश्रा, हवालदार रविंद्र भुजाडे, अंकूश राठोड आणि प्रवीण भोयर यांनी आरोपीला अटक केली.

अधिक माहितीसाठी - कोरोनाकाळात फुफ्फुस ठेवा स्वस्थ; पुढील उपाय करण्याचा डॉ. मीना देशमुख यांचा सल्ला

बसस्थानकावर रचला सापळा  

बनारसीचा खून केल्यानंतर निक्की वस्तीतून पळून गेला. दुसऱ्या दिवशी शनिवारी त्याने कपडे बदलून हाप पॅंट आणि टी शर्ट घातले. कपड्याची थैली भरून त्याने गणेशपेठमधील मध्यवर्ती बसस्थानक गाठले. पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी लगेच बसस्थानकावर सापळा रचला. या सापळ्यात आरोपी निक्की गायकवाड अलगद अडकला.

संपादन - अथर्व महांकाळ