चोरीच्या रकमेवरून झाला वाद, दारूच्या नशेत उचलला दगड आणि...

अनिल कांबळे
मंगळवार, 23 जून 2020

एकमेकांच्या संगतीने दोघेही चोऱ्या-घरफोड्या करायचे. चोरीच्या पैशातून रात्री डॉ. दाजी देशमुख मार्गावरील एका पडक्‍या घरात जाऊन दारू आणि गांजा फुकायचा, असा नेहमीचा नित्यनियम होता. रामू बेरोजगार होता तर पप्पू कल्पना बिल्डिंगजवळ फुटपाथवर कपड्यांना इस्त्रीचे काम करायचा.

नागपूर : धंतोलीतील डॉ. दाजी देशमुख मार्गावरील पडक्‍या घरात कुजलेल्या अवस्थेत एका युवकाचा मृतदेह आढळला होता. मृताची ओळख पटली नसल्याने तपास सुरू होता. मात्र, सोमवारी या हत्याकांडाचा सुगावा लागला. पोलिसांनी एका आरोपीस अटक केली. पंकज ऊर्फ पप्पू संजय बैसवारे (वय 23, कल्पना बिल्डिंगजवळ, रामदासपेठ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामू संजय सावळे (वय 24, रा. सरस्वतीनगर, तकिया) आणि पप्पू बैसवारे हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. दोघांनाही दारूचे व्यसन होते. एकमेकांच्या संगतीने दोघेही चोऱ्या-घरफोड्या करायचे. चोरीच्या पैशातून रात्री डॉ. दाजी देशमुख मार्गावरील एका पडक्‍या घरात जाऊन दारू आणि गांजा फुकायचा, असा नेहमीचा नित्यनियम होता. रामू बेरोजगार होता तर पप्पू कल्पना बिल्डिंगजवळ फुटपाथवर कपड्यांना इस्त्रीचे काम करायचा.

युवकाचा 'फिल्मी स्टाईल'ने तलवारीने भोसकून खून

दोघांचीही मिळकत जेमतेम आणि दारूचा भारी शौक असल्याने दोघेही 'जुगाड' करण्यासाठी सावज हेरत होते. रामू आणि पप्पू यांनी एका ठिकाणी चोरी केली. चोरीचा माल विकून काही रक्‍कम दोघांकडे आली. त्यांनी 8 जूनला नेहमीच्या अड्ड्यावर दारू आणि मटण नेले. तेथे दोघांनी येथेच्छ ताव मारला. पप्पूने चोरीचा माल विकून आलेल्या रकमेतील काही रक्‍कम रामूला मागितली. रामू चिडला. त्याने पैसे देण्यास नकार दिला. याच वादातून दोघांची हाणामारी झाली. रामूने पप्पूच्या डोक्‍यात दगड घातला. पप्पू रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर रामूने पळ काढला.

मृतदेह लपवून ठेवला

रामू सावळे कुख्यात असून, पप्पूवर केवळ जखमी करण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता. मात्र, रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या पप्पूचा रात्रभर बेशुद्ध पडल्यामुळे मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी रात्री रामूने पडक्‍या घरात जाऊन पाहिले. त्यावेळी पप्पू मृतावस्थेत दिसला. रामू घाबरला. त्याने लगेच त्यांच्या मृतदेह तेथेच आडोशाला लपवून ठेवला आणि पुन्हा पळ काढला.

प्रेमिकेला भेटण्यासाठी मुले घेतात मुलींचा वेश, या जिल्ह्यात आहे हा खास रस्ता

असे आले हत्याकांड उघडकीस

पडक्‍या घरातून दुर्गंध यायला लागल्याने शेजारी राहणाऱ्या डॉक्‍टर दाम्पत्याने पहिल्या दिवशी दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्या दिवशी दुर्गंध वाढल्याने त्यांनी धंतोली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून हत्याकांड उघडकीस आले.

आरोपी होता रंगेल

रामू सावळे याच्यावर चोरी आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी धंतोलीत गुन्हे दाखल आहेत. रामू अविवाहित असून, त्याने शेजारी राहणाऱ्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. महिलेच्या घरात घुसून तिच्या नवऱ्याला मारहाण करीत होता. पतीने दोघांनाही विचित्र अवस्थेत बघितल्यानंतर वाद घातला. रामूने थेट चाकूने त्याच्यावर हल्ला केला होता. त्या महिलेचे शौक पूर्ण करण्यासाठी रामू चोरी आणि घरफोडी करीत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friend's murdered