एक दिवस भरलेली शाळा दुसऱ्याच दिवशी बंद, ही काय नवी भानगड...

सावरगाव : केवळ एक दिवस सुरू झाल्यानंतर दुस-या दिवशी बंद करण्यात आलेली शाळा.
सावरगाव : केवळ एक दिवस सुरू झाल्यानंतर दुस-या दिवशी बंद करण्यात आलेली शाळा.

जलालखेडा/सावरगाव (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यात सोमवारपासून सुरू झालेले सावरगाव येथील एकलव्य विद्यालय गटशिक्षणाधिका-यांच्या तोंडी आदेशामुळे एका दिवसात बंद करण्यात आल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक वाचा : रेल्वेतून पार्सल पाठवताय्‌ जरा सावध व्हा, हे प्रकार वाढले

शासनाचे परिपत्रक काय म्हणते...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार शाळा व्यवस्थापन समितीने परिपत्रकात दिलेल्या निर्बंध व निर्देशानुसार व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच कोणत्याही पालकाला जोर जबरदस्ती न करता स्वयंखुषीने पालकांची संमती जर असेल तर नववी व दहावीचे वर्ग सुरू करता येतील असे स्पष्ट म्हटले आहे. शासनाच्या निर्देश व निर्बंधानुसार तालुक्‍यातील एकलव्य स्कॉलर्स स्कूल सावरगाव 6जूनला सुरू झाली. पालकांच्या संमतीने नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. तब्बल चार महिन्यानंतर आज शाळेची घंटा वाजली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती पन्नास टक्केच्या जवळपास होती. विद्यार्थी व पालकांचा संभ्रम दूर झाला. शासनाने15 जूनला काढलेल्या परिपत्रकानुसार शाळा व्यवस्थापन समिती व पालकांची संमती असेल तर शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली.
अधिक वाचा : निलंबित शिवसेना शहरप्रमुख कडवच्या पत्नीला

ऑनलाइनचा बोजवारा
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केले. परंतु ते ग्रामीण भागात यशस्वी होऊ शकले नाही. तालुक्‍यातील ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर व मजूर बहुसंख्येने आहेत. कित्तेकाकडे अँड्रॉईड मोबाईल नाही. इंटरनेट कनेकशन नाही. रेंज नाही अशी परिस्थिती आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता पालकांना पडणारा आर्थिक भुर्दंड सहन करण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याशिवाय दुसरा पर्याय ग्रामीण भागात नाही. त्यामुळेच पालकांनी शाळा सुरू करण्यास संमती दिली. एकलव्य शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेचा पूर्ण परिसर, वर्ग खोल्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्या. प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल स्कॅनिंग मशीनच्या मदतीने तापमान घेण्यात येऊन त्यांना सॅनिटाइज करण्यात आले होते. एका वर्ग खोलीत केवळ 15 विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. दोन डेस्कमध्ये1 मीटरचे अंतर ठेवून एका डेस्कवर एकाच विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थी शिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क लावले होते. शाळेत हॅंडवॉश व सॅनिटाझरची व्यवस्था होती. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य शेअरिंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली. वॉश रूमला जाण्याची एकावेळी एकाच विद्यार्थ्याला परवानगी देण्यात आली. शारीरिक अंतर राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात करण्यात आला. शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

हेही वाचा : बारावीच्या विद्यार्थ्यांना आता फेरमूल्यांकनासाठी मिळणार ऑनलाईन प्रत

कामाचा व्याप वाढू नये म्हणून हा निर्णय...
तालुक्‍यात जर एक शाळा सुरू झाली तर इतरही शाळा सुरू कराव्या लागतील. पालकांची शाळा सुरू करण्याची मागणी वाढेल. कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांकडून विचारणा होईल. भविष्यात जर काही
कमी जास्त झाले तर आपल्यावर जबाबदारी येईल, या भीतीने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड यांनी शासनाच्या परिपत्रकाला तिलांजली दिली. शिक्षण विभागाकडून शाळा बंद करण्याचा कोणताही आदेश नसताना शाळेच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी फोनवरून शाळा बंद करण्याचे आदेश शाळेला दिले. एक दिवस भरलेली शाळा दुसऱ्याच दिवशी बंद झाली .विशेष बाब म्हणजे वरिष्ठांकडून वर्ग 9व 10ची शाळा बंद करण्याचे कोणतेही आदेश नाहीत. फक्त कामाचा व्याप वाढू नये म्हणून हा आदेश दिला, असे प्रथमदर्शनी दिसते.

मार्केटींगचा सुळसुळाट
सध्या ग्रामीण भागातही ऑनलाईन शाळा सुरू आहेत. शैक्षणिक सॉफ्टवेअर विकणारे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात तालुक्‍यात "मार्केटिंग' करीत आहे. शाळा सुरू झाल्या तर सॉफ्टवेअरची मागणी ठप्प पडेल, ही बाब तर शाळा बंद करण्यामागे नसेल. शाळा व्यवस्थापनाची तयारी व पालकांची संमती असताना शाळा सुरू करावी, अशी मागणी पालक वर्गाकडून करण्यात आली आहे. तसेच शाळा बंद करण्याचा आदेशाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

काहीच माहित नाही
शाळा सुरु करण्याबाबत तसेच सुरु झालेली शाळा बंद करण्याबाबत आपण कुठलेही आदेश शाळेला दिले नाही. शासनाचे 15 जून व 24 जूनच्या परिपत्रकानुसार शाळांना कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. तसेच सुरु करून बंद करण्यात आलेली शाळा ही जिल्हा परिषदची शाळा नाही व तसेच ती खासगी शाळा आहे. यामुळे त्यांनी शाळा कशी सुरु केली व का बंद केली. याबाबत आपणास काही माहिती नाही.
दिनेश धवड
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, नरखेड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com