गडकरी यांनी फूड प्रोसेसिंग उद्योजकांना काय दिला सल्ला...जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जून 2020

सर्व जण चिंतित आहेत. आता कोरोनाची भीती आणि नैराश्‍य दूर सारून समस्येचा सामना करावा लागणार आहे.

नागपूर : फूड उद्योगात रोजगाराची प्रचंड क्षमता असून खवय्यांची चव लक्षात घेऊन उद्योजकांनी खाद्य पदार्थ बनवावे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच लघु, सूक्ष्म उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

"फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री'च्या पदाधिकाऱ्यांशी गडकरी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सर्व जण चिंतित आहेत. आता कोरोनाची भीती आणि नैराश्‍य दूर सारून समस्येचा सामना करावा लागणार आहे. कोरोनासोबत जीवन जगण्याची पद्धती अवलंबून आपल्याला कामे करावी लागणार आहेत, असे ते म्हणाले. 

या क्षेत्राचा शेतकऱ्यांनाही अधिक फायदा होतो, असे सांगताना गडकरी म्हणाले- खाद्य पदार्थांसाठी लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांकडूनच मिळतो. या उद्योगातही नवीन संशोधन झाले तर आपली उत्पादने निर्यातयोग्य होतील. एमएसएमईत अनेक उद्योगांची नोंद आहे. अन्न-खाद्य उद्योगाने वाहतूक खर्च, कामगार खर्च, विजेचा खर्च कमी केला गेला पाहिजे. तसेच दर्जात कोणताही समझोता नको, तरच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण टिकू शकणार आहोत.

एमएसएमईच्या फंड ऑफ फंड योजनेत आम्ही 50 हजार कोटींची तरतूद केली आहे. जे उद्योगांचा जीएसटी रेकॉर्ड चांगला, आयकराच्या दृष्टीने जे उद्योग योग्य आहे. अशा उद्योगांना एमएसएमई स्टॉक एक्‍स्चेंचा फायदा होईल. यासाठी 15 टक्के इक्विटी शासन देणार आहे. या उद्योगांना भागभांडवल उभारणीस मदत होईल, असे गडकरी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gadkari advised food processor through video conferencing