बुटीबोरी परिसरात 'जुगार' जोरात, पोलिसांचे दुर्लक्ष

योगेश बरवड
Saturday, 3 October 2020

बुटीबोरी हे मोठे वर्दळीचे ठिकाण आहे. बुटीबोरीच्या मुख्य रोड लगतच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शोरूममध्ये, शेतात, रेल्वे पटरी, जुनी वस्ती, सोनूर्ली आदी ठिकाणी जुगाराचा व्यवसाय दररोज चालत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नागपूर : बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक नव्हे तर चार-पाच ठिकाणी जुगार व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याची चर्चा बुटीबोरी परिसरात सुरू आहे. यामुळे गुन्हेगारी कधी डोके वर काढेल याची शक्यता नाकारता येत नाही. 

बुटीबोरी हे मोठे वर्दळीचे ठिकाण आहे. बुटीबोरीच्या मुख्य रोड लगतच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शोरूममध्ये, शेतात, रेल्वे पटरी, जुनी वस्ती, सोनूर्ली आदी ठिकाणी जुगाराचा व्यवसाय दररोज चालत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीस कारवाईला येतेवेळी अगोदरच त्यांना माहिती मिळत असल्याचेही नागरिक सांगतात. यामुळे जुगार आणि जुगाऱ्यांना पोलिसांचे तर अभय नाही ना? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. 

हेही वाचा -नागपुरातील सिताबर्डी मुख्य रस्ता होणार 'व्हेईकल फ्री झोन', लवकरच प्रस्तावावर शिक्कामोर्तब

जुगाऱ्यांची ग्रामीणकडे धाव - 
नागपूर शहरामध्ये मटका, जुगार आदी व्यवसाय काही ठिकाणी चालायचे. आता नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त अतिशय शिस्तप्रिय असताना अवैध व्यवसाय करणाऱ्याची काही खैर नाही, अशी चर्चा सुरू झाली. काही अवैध व्यवसाय बंद पडायला सुरुवात झाल्याने पोलीस आयुक्त अत्यंत कडक व शिस्तबद्ध असल्याने जुगार व्यावसायिकांनी शहर सोडून ग्रामीणकडे धाव घेतल्याचे दिसत आहे. 

हेही वाचा - सोमवारपासून प्रशासनाची पुन्हा परीक्षा,  शुक्रवारी  ...

गुन्हेगारी वाढण्याची शक्यता -
बुटीबोरी येथे सुरू असलेल्या जुगार व्यवसायात नागपूरची प्रसिद्ध मंडळी खेळायला येत असल्याने यातून गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे. परिसरात गुन्हेगारी वाढू नये म्हणून दक्षता घेण्याची गरज आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gambling increases in butibori of nagpur