‘मम्मी-पप्पा मुझे माफ करो' असे म्हणत तिने संपवले जीवन.. पण असे काय घडले; जाणून घ्या 

Girl in Nagpur end herlife as parents opposed for love marriage
Girl in Nagpur end herlife as parents opposed for love marriage

नागपूर : प्रेमविवाहाला कुटुंबियांनी विरोध केल्यामुळे युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना महादुल्यात उघडकीस आली. पूजा उर्फ नगमा (१९) असे आत्महत्या करणाऱ्या युवतीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजाचे आईवडील हातमजुरी करतात. पूजाला मोठी बहिण आहे. ती पदवीच्या प्रथम वर्षाला शिकते. तिची सलमान (बदललेले नाव) नावाच्या मुलाशी मैत्री झाली. दोघांचे मोबाईलवरून बोलने सुरू झाले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या. पाहता पाहता दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. 

त्यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा वस्तीत व्हायला लागली. त्यामुळे ती कुणकुण पूजाच्या आई-वडीलांपर्यंत पोहचली. आईने पूजाला दोन झापड मारल्या आणि तिला घरातून बाहेर निघायला बंदी घातली. त्यामुळे काही दिवस दोघांच्या भेटी होऊ शकल्या नाही. आई-वडील कामावर गेल्यावर मोठ्या बहिणीला हुलकावणी देऊन पूजा ही सलमानला भेटायला जात होती. दोघांचे प्रेम पुन्हा बहरले. दोघांनीही कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला.

कुटुबीयांचा विरोध

पूजा आणि सलमान यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होऊ लागली. पूजाने कुटुंबीयांसमोर सलमानशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र त्यांनी थेट नकार दिला. आता लग्न होणार नसल्याने निराश झालेल्या पूजाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिची सलमानने समजूत घालण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

अन् घेतला गळफास

आई-वडील कामावर तर बहिण मैत्रिणीकडे गेल्याने घरात पूजा एकटीच होती. तिने घराच्या आड्याला ओढनी बांधली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता तिची बहिण घरी आली. तिने दार उघडताच पूजा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

...मम्मी-पप्पा सॉरी

पूजाने आपली व्यथा मैत्रिणीला सांगितली होती. ‘मै सलमान की नहीं तो किसीकी नहीं’ अशी भूमिका तिने घेतली होती. ‘मम्मी-पप्पा सॉरी, दीदी आप भी मुझे माफ कर दो...’ अशी सुसाईड नोट लिहिली. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com