
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी रिया (काल्पनिक नाव) ही दहाव्या वर्गाची विद्यार्थीनी आहे. तिचे वडील शासकीय नोकरीत आहेत. आरोपी ऋषभ हा सुद्धा शिक्षण घेत आहे.
नागपूर ः दहावीची विद्यार्थीनी असलेल्या १५ वर्षीय मुलीला युवकाने जाळ्यात ओढले. तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती मुलगी ५ महिन्यांची गर्भवती झाली. पोट दुखते म्हणून आईने डॉक्टरकडे नेल्यानंतर गर्भवती असल्याची बाब लक्षात आली. त्यानंतर मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ऋषभ इंदूरकर (१८, रा. गिट्टीखदान) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी रिया (काल्पनिक नाव) ही दहाव्या वर्गाची विद्यार्थीनी आहे. तिचे वडील शासकीय नोकरीत आहेत. आरोपी ऋषभ हा सुद्धा शिक्षण घेत आहे. दोघांची गेल्या काही महिन्यांपूर्वी ओळख झाली. दोघेही एकमेकांशी नेहमी बोलायला लागले. ऋषभने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या. आईवडीलांच्या लपून दोघेही फिरायला जाऊ लागले.
सविस्तर वाचा - ऐटीत खरेदी करायला गेला पोलिसांची वर्दी; दुकानदाराला आला संशय आणि घडली जेलवारी
काही दिवसांतच तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडली. २४ जून रोजी रियाच्या घरी कुणी नव्हते. त्यामुळे रियाने ऋषभला भेटायला घरी बोलावले. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही दोन ते तीनदा रियाच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून ऋषभने रियाशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
डॉक्टरमुळे फुटले बिंग
रीयाच्या पोटात दुखत असल्यामुळे तिच्या आईने दवाखाण्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता चक्क साडेचार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले.त्यामुळे तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. आईने डोक्यावर हात मारला आणि थेट घर गाठले. कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर तिने ऋषभचे नाव सांगितले. त्यांनी मुलीसह गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून ऋषभला अटक केली.
आई-वडीलांसमोर पेच
रियाचे वय केवळ १५ वर्षे आहे. नियमांनुसार केवळ तीन महिन्यांपर्यंत गर्भपात करण्यात येते. ती पाच महिन्यांची गर्भवती असल्यामुळे आईवडीलांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आता गर्भपातासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागणार आहे. त्यामुळे गर्भवती मुलगी आणि कुटुंबियांसमोर अडचणींचा डोंगर उभा आहे.
संपादन - अथर्व महांकाळ