
नागपूर : नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झालेल्या युवतीवर कारमध्ये बलात्कार केला. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शोषण केले. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रिझवान उस्मान शेख (२८, रा. पीसी क्वॉर्टर, पोलिस लाईन टाकळी, नागपूर) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय तरुणी उच्चशिक्षित आहे. आरोपीसोबत तिची मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख झाली. रिझवानने मैत्रिणीकडून तिचा मोबाईल नंबर घेतला आणि चॅटिंग करायला लागला. २०१४ मध्ये त्याने तिला वर्धा रोडवर भेटायला बोलावले. फिरून येऊ अशी थाप मारली आणि थेट जंगलात नेऊन कार थांबवली. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रिझवानने तिचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शोषण केले. हे फोटो तुझ्या आई-वडिलांना टपालाने पाठवील, अशी धमकी तो द्यायचा.
धमक्यांमुळे युवती रिझवानच्या जाळ्यात पक्की अडकली होती. त्यामुळे आई-वडिलांना खोटे सांगून ती रिझवानसोबत पुणे, जबलपूर आणि अन्य ठिकाणी गेली. येथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. तो वारंवार फोटो काढत होता. या प्रकाराला ती कंटाळली होती.
फोटो व्हायरल करण्याच्या धमकीला ती घाबरत नसल्याचे बघून रिझवानने लग्नाचे आमिष दाखवले. सहा महिन्यांत लग्न करू असा विश्वास दाखवत सहा वर्षे ताटकळत ठेवले. नंतर मात्र नात्यातील एका युवतीशी चुपचाप साखरपुडा उरकण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच युवतीने लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी लग्नाला नकार देत पेन ड्राईव्हभर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
पीडितेची कारही रिझवानने धमकी देऊन हडपली. गावी जाऊन परत येतो असे म्हणून तिची कार तो वापरायला लागला. पोलिस क्वॉर्टर गाठून कार परत मागितली असता त्याने दारू पिऊन तिला जबर मारहाण केली. तसेच कार परत करण्यासही नकार दिला. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने गिट्टीखदान पोलिसांत तक्रार केली.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.