गुढी उभारण्यासाठी ही आहे सर्वोत्तम वेळ... वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 March 2020

यादिवशी ज्योतिषाचार्यांचीसुद्धा पूजा करून आशीर्वाद प्राप्त करावे. ज्योतिषाद्वारे वर्षफल ऐकल्यास सूर्य आरोग्याची वृद्धी करतो, चंद्र निर्मल यशाची, मंगळ ऐश्‍वर्याची, बुध बुद्धीची, गुरू थोरपणाची, शुक्र कोमलवाणीची, शनी आनंदाची, राहू विरोधनाशक, आशा बाहुबलाची आणि केतू कुलाच्या उन्नतीची वृद्धी करतो, गुढीपाडव्याच्या दिवशी लहान मुलांच्या पाटी-पेन्सीलचे पूजन केले जाते.

नागपूर : नवीन शार्वरी नामक संवत्सर शके 1942 हे फाल्गुन अमावस्या म्हणजे मंगळवार (ता.24) पासून दुपारी 2.55 मि. सुरू होईल. चैत्र शुद्ध प्रतिपदेला बुधवार (ता. 25) रोजी गुढीपाडवा आहे. यानिमित्त सूर्योदयाला सकाळी साडेसहा ते साडेनऊ यावेळेत घरासमोर उंच जागेवर गुढी उभारून तिची पूजा करावी, असे ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले आहे. 

बुधवार (ता. 25) रोजी सकाळी 6.23 मि. आहे तर सूर्यास्त सायंकाळी 6.32 वाजता आहे. सूर्य मीन राशीतून भ्रमण करणार आहे. गुढी उभारण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 6.30 ते 9.30 वाजेपर्यंत आहे. यावेळी चंद्र मीन राशीत रेवती नक्षत्रात असून तो 15 कला आणि 41 विकलावरून भ्रमण करेल. तसेच यावेळी धनू राशीतून भ्रमण करणाऱ्या गुरूचा शुभप्रवाह वातावरणात मोठ्या प्रमाणात राहणार आहे. यादिवशी राहू काल दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत आहे. सकाळी गुढी उभारल्यानंतर ब्राह्मणासह देवाची व गुरूची पूजा करावी. पंचांग आणून त्यावर असलेल्या गणपतीच्या फोटोची पूजा करावी.

सूर्योदयावेळी उभारा गुढी 
यादिवशी ज्योतिषाचार्यांचीसुद्धा पूजा करून आशीर्वाद प्राप्त करावे. ज्योतिषाद्वारे वर्षफल ऐकल्यास सूर्य आरोग्याची वृद्धी करतो, चंद्र निर्मल यशाची, मंगळ ऐश्‍वर्याची, बुध बुद्धीची, गुरू थोरपणाची, शुक्र कोमलवाणीची, शनी आनंदाची, राहू विरोधनाशक, आशा बाहुबलाची आणि केतू कुलाच्या उन्नतीची वृद्धी करतो, गुढीपाडव्याच्या दिवशी लहान मुलांच्या पाटी-पेन्सीलचे पूजन केले जाते. तसेच सरस्वती पूजन करण्यात येते.

बाजारपेठांमध्ये शुकशुकाट, कसा साजरा करणार गुढीपाडवा?

पाटीवर चंद्र, सूर्य, सरस्वतीची रांगोळी काढून गंध, फुले, अक्षता व हळदी-कुंकू वाहावे. उदबत्तीने ओवाळावे, नैवद्यासाठी गुळखोबरे ठेवावे. नवीन वर्षाच्या आगमनाने नवीन संकल्पना, नवीन योजना राबवाव्यात असा संदेश या दिवशी दिला जातो. शास्त्रानुसार सायंकाळी सूर्यास्तापूर्वी गुढीचे सौभाग्य द्रव्याने पूजन करून गुढी उतरवावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gudipadva festival worship time