घरातूनच विकत होता या वस्तू; पोलिसांनी पकडले रंगेहात

tobacco
tobacco

नागपूर  : लॉकडाऊनमध्येही पान मसाला आणि खर्रा तयार करीत घरून त्यांची विक्री करणाऱ्या व्यक्तिला गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने अटक केली.

अटकेतील आरोपी गरोबा मैदान निवासी शंकर बळीराम कोल्हे (58) आहे. पोलिसांचे पथक काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांची चौकशी करीत होते. दरम्यान माहिती मिळाली की, शंकर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू, खर्रा आणि पान मसाला विकत आहे.      पोलिस पथकाने त्याच्या घरावर धाड टाकून 10 किलो तयार खर्रा, पान मसाला आणि तंबाखूसह 14,825 रुपयांचा माल जप्त केला.

ही कारवाई वपोनि अशोक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सपोनि दिलीप चंदन, पोहवा अजय बघेल, अजय रोडे, सुधाकर धंदर, नापोशि प्रशांत कोडापे, बबन राऊत, अविनाश ठाकुर, अन्न सुरक्षा अधिकारी अमितकुमार उपलप, औषध निरीक्षक नीरज लोहकरे, वैध मापन निरीक्षक शरद मोरे आणि अमरदीप मेश्राम यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com