फडणवीसांनी पत्राद्वारे केलेल्या आरोपांवर राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण

टीम ई सकाळ 
Thursday, 29 October 2020

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत मागील शासनाने मंत्रीगटाची नेमणूक केली होती. तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचे अध्यक्ष होते.

नागपूर ः राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी ४०० कोटी रुपयांचे कलेक्शन केले जात आहे. यासंदर्भात राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या ४०० कोटी रुपयांचा घोटाळा होत आहे असा आरोपही त्यांनी केला होता. आता या पत्राला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे.  

हेही वाचा - प्रेमाचं अनोखं उदाहरण! शेतकऱ्याने पार पाडले मृत बैलाचे दशक्रिया विधी; लोकांना दिले तेराव्याचे जेवण

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत मागील शासनाने मंत्रीगटाची नेमणूक केली होती. तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचे अध्यक्ष होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत या मंत्रीगटाने शिफारस केली होती. ही कार्यवाही गेल्या वेळेच्या शासन काळातच सुरू झाली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी रक्कम गोळा केल्याबाबतची माहिती गेल्या महिन्यात गडचिरोली भागातून प्राप्त झाली होती. मी तत्काळ गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक जयस्वाल यांना याप्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याचे व दोषींवर कारवाई निर्देश दिले होते. 

क्लिक करा - संगीत कलाकार दारोदार भटकत विकतोय प्लास्टिकच्या वस्तू, पण त्यातूनही भागत नाही पोटाची भूख

याप्रकरणाची पोलिस चौकशी सुरू आहे. कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागात कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत विविध विभागांच्या अभिप्रायाने सामान्य प्रशासन विभागामार्फत सर्वसमावेशक धोरण करण्याचे प्रस्तावित असल्याचे आरोग्यमंत्री यांनी म्हटले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health minister rajesh tope answer to devendra fadanvis letter to CM