esakal | दहशतवाद्यांच्या टार्गेटवर संघ मुख्यालय, हे आहे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

RSS headquarter

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि कार्यालय नेहमीच दहशतवाद्यांचे टार्गेट राहिले आहे. त्यामुळे आरएसएस कार्यालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच बंदुकधारी जवानांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. "आयबी'ने दिलेल्या माहितीनंतर नागपुरात पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर संघ मुख्यालय, हे आहे कारण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दहशतवादी संघटनांनी मोठे षड्‌यंत्र रचले आहे. महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानसह अन्य ठिकाणी घातपात घडवून आणण्याची तयारी केली आहे, अशा आशयाचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. दहशतवादी विस्फोटकांनी भरलेला ट्रक संघ कार्यालयात शिरवून स्फोट घडवून आणण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांनी अलर्ट जाहीर केला आहे. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. 

दहशतवादी संघटना घातपात घडवून आणणार असल्याचे समजताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आलेली आहे. "आयबी'ने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी आरएसएसचे नेते, कार्यालय आणि पोलिस ठाण्यावर हल्ल्याची योजना आखली आहे. त्यानुसार दहशतवादी विस्फोटकांनी भरलेला ट्रक कार्यालयात शिरवून स्फोट घडवून आणण्याची शक्‍यता आहे. तसेच रेल्वे स्थानकावरसुद्धा स्फोट घडवून आणण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आणि कार्यालय नेहमीच दहशतवाद्यांचे टार्गेट राहिले आहे. त्यामुळे आरएसएस कार्यालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच बंदुकधारी जवानांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. "आयबी'ने दिलेल्या माहितीनंतर नागपुरात पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

अधिक वाचा - अंकिताला जिवानिशी ठार करणे हाच होता विकेशचा उद्देश

दहशतवादी संघटना घातपात घडवून आणणार असल्याचे समजता आयबीने अलर्ट राहण्याचे सांगितले आहे. संबंधित राज्यांमध्ये सुरक्षा अधिक वाढविण्यात आलेली आहे. नागपुरात आरएसएसचे मुख्यालय आहे. तसेच याच्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कार्यालयसुद्धा आहेत. त्यामुळेच अलर्ट जारी करण्यात आला आहे. अलर्टनंतर आरएसएस नेत्यांच्या सुरक्षेची चौकशी केली जात आहे.

असे का घडले? - कोणी सांगेल का? माझी काय चूक होती... 

पोलिसांची करडी नजर
नागपुरात अलर्ट जाही करण्यात आला आहे. सर्वत्र नजर आहे. महामार्गावरून जाणारे ट्रक व जड वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदीही करण्यात आली आहे. पोलिस डोळ्यात तेल टाकून लक्ष देत आहेत. तसेच शहरातील महत्त्वपूर्ण स्थानकांवरचीही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 
- डॉ. भूषणकुमार उपाध्याय, 
पोलिस आयुक्‍त, नागपूर