नागपुरात आढळल्या शेकडो मृत कोंबड्या, अनेक दिवसांपासून ठेवल्या होत्या साठवून

hundreds of dead hens found in kalmeshwar of nagpur
hundreds of dead hens found in kalmeshwar of nagpur

कळमेश्वर ( जि. नागपूर ) : राज्यात 'बर्ड फ्ल्यू'च्या शिरकावानंतर पशूसंवर्धन विभाग अलर्ट होतानाचे चित्र असताना कळमेश्वर तालुक्यातील सावळी खुर्द येथील एका खासगी पोल्ट्री फॉर्ममध्ये शनिवारी शेकडो कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्या आहेत. त्यामुळे या परिसरात पुन्हा चर्चेला उधाण आले. 

राज्यातील पशूसंवर्धन विभाग बर्ड फ्लूच्या संकटाची भीती व्यक्त करीत असतानाच तालुक्यात रोज मृत कोंबड्या आढळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तालुक्यातील उबगी, धापेवाडा व चंद्रभागा नदीच्या पात्राच्या चर्चा थंड होण्यापूर्वीच शनिवारी सावळी खुर्द येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या स्वगृही मतदारसंघातील कळमेश्वर तालुक्यांतर्गत येणाऱ्या सावळी खुर्द येथील पोल्ट्री फार्ममध्ये गेल्या कित्येक तासापासून मृत कोंबड्या साठवून ठेवल्या होत्या. तेथील सरपंच मंगेश चोरे यांच्या समयसूचकता व पुढाकारामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. नुकतेच तालुक्यातील उबगी येथील पोल्ट्री फॉर्ममध्ये २५० कोंबड्यांचा डीजेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाने लावला होता. त्या २५० कोंबड्या जमिनीमध्ये खड्डा करून पुरण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली होती. परंतु, अचानकपणे चंद्रभागेच्या नदीपात्रात मोठ्या संख्येत मृत कोंबड्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अद्याप याबद्दल पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्टीकरण आले नाही. चंद्रभागेच्या नदीपात्रात कोंबड्या फेकणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com