esakal | पती-पत्नी चालवायचे देहव्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून केली युवतीची सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

Husband and wife arrested from Khadgaon area in Nagpur Gramin

पंटरने पोलिसांना इशारा करताच छापा घालण्यात आला. पोलिसांनी या तिघांना ही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात आली.

पती-पत्नी चालवायचे देहव्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून केली युवतीची सुटका

sakal_logo
By
विजय वानखेडे

वाडी (जि. नागपूर) : वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडगाव रोडवर असलेल्या एका निवासी संकुलात सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट’वर पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात दलाल पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली तर देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या तरुणीची सुटका करण्यात आली. सुनील चोखांद्रे (वय ३८) व पत्नी मंजूषा चोखांद्रे (वय २८) अशी अटक करण्यात आलेल्या दलालांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून वाडी परिसरात देहव्यापार मोठ्या प्रमाणात सुरू होता. गुन्हे शाखेच्या एसएसबी विभागाचा वचक नसल्यामुळे सीताबर्डी, हुडकेश्‍वर, वाडी-हिंगणा आणि मनीषनगरात देहव्यापार सुरू आहे. चक्क रहिवाशी असलेल्या पॉश इमारतीतसुद्धा दलालांची पाळेमुळे घट्ट झाली आहेत.

सविस्तर वाचा - सतत ॲसिडिटीचा त्रास होतो? आहारात करा पुढील बदल; फरक नक्की जाणवेल

वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडगाव मार्गावरील सोनबानगर येथील साई अर्चना अपार्टमेंटच्या इमारतीत सुनील चोखांद्रे (वय ३८) व पत्नी मंजूषा चोखांद्रे (वय २८) एका युवतीकडून देहव्यापार करवून घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री साडेआठच्या दरम्यान वाडी पोलिसांनी पंटरला सुनीलकडे पाठविले. पंटरने सुनील आणि त्याची पत्नी मंजूषा हिच्यासोबत पैशाबाबत बोलणी केली. सौदा पक्का झाल्यानंतर सुनीलने पंटरकडे एक तरुणी पाठवली.

पंटरने पोलिसांना इशारा करताच छापा घालण्यात आला. पोलिसांनी या तिघांना ही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार कार्यवाही करण्यात आली. पोलिस उपायुक्त नुरुल हसन, सहायक पोलिस आयुक्त अशोक बागुल, पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस निरीक्षक रेखा संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, हवालदार प्रमोद गिरी, राजेश धाकडे, संतोष उपाध्याय, दुर्गादास माकडे, ईश्वर राठोड, शिवशंकर शेंडे, उदय प्रकाश त्रिपाठी, गोपीचंद चव्हाण, राजकमल गाडीबैल यांनी केली.

जाणून घ्या - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना सापडला उद्योगाचा मार्ग, आता महिन्याला कमावतोय लाखो रुपये

ऑनलाईन देहव्यापाराकडे दुर्लक्ष

सध्या इंटरनेटवर ‘ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्ही’स उपलब्ध आहे. थेट मोबाईल क्रमांक टाकून आंबटशौकिनांना तरुणी पुरविण्याचे काम होत आहे. तसेच शहरातील पॉश इमारतीतसुद्धा अनेक दलाल सक्रिय असून, एसएसबीचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

संपादन - नीलेश डाखोरे