esakal | जगण्या-मरण्याच्या आणाभाका ठरल्या खऱ्या; पती पाठोपाठ पत्नीने सोडले प्राण

बोलून बातमी शोधा

Husband followed by wife left life Nagpur news

‘जियेंगे तो साथ, मरेंगे तो साथ’ असे ते नेहमी गंमतीने म्हणत असत. त्यांचे म्हणणे या दोघांच्या मृत्युमुळे आज खरे ठरले. नरखेड तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वृध्दीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

जगण्या-मरण्याच्या आणाभाका ठरल्या खऱ्या; पती पाठोपाठ पत्नीने सोडले प्राण
sakal_logo
By
टीम ई सकाळ

जलालखेडा (जि. नागपूर) : भारतीय संस्कृतीत पत्नी ही पतीची ‘अर्धांगिणी’ असल्याचे म्हटले आहे. प्रेमीयुगुल तारुण्यात जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेतात. परंतु, दिलेले वचन पाळण्याचे सौजन्य फार थोडे पार पाडतात. भारतीय जनता पक्षाचे नरखेड येथील नेते कमलकिशोर उपाख्य रावसाहेब खुटाटे (वय ७७) यांचे पहाटे तीनच्या दरम्यान राहत्या घरी दुर्धर आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता पत्नी विमलादेवी खुटाटे (वय ७०) यांना कळताच त्यांनीही सकाळी आठ वाजता दरम्यान प्राण त्यागले. दोन्ही पती-पत्नीची निधनाची वार्ता कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

खुटाटे दाम्पत्य आयुष्याच्या सायंकाळी एकमेकांसोबत एकमेकांची सावली होऊन जगत होते. त्यांना पाच मुली व एक मुलगा असे अपत्य आहे. मुलगा हा छत्तीसगड येथे राहतो. सर्व मुली लग्न होऊन सासरी राहतात. खुटाटे वृध्द दाम्पत्य एकमेकांच्या सोबतीने नरखेड येथे वास्तव्यास होते. दोघेही वृध्द व आजारी असल्याने एकमेकांची सुश्रृषा करून काळजी घेत होते.

महत्त्वाची बातमी - अकोल्यासह विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे संकेत

‘जियेंगे तो साथ, मरेंगे तो साथ’ असे ते नेहमी गंमतीने म्हणत असत. त्यांचे म्हणणे या दोघांच्या मृत्युमुळे आज खरे ठरले. नरखेड तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वृध्दीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सायंकाळी ५ वाजता स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्यावर त्यांचा नातू नीरज याने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील भाजपसोबत सर्व पक्षीय नेते कार्यकर्त्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.