स्टार्टअप : कारची चकाकी वाढवणार ‘हायब्रीड सिरॅमिक वॉश'; ‘गोवॉश’ देणार अनेक सुविधा

Hybrid ceramic wash that will enhance the shine of the car
Hybrid ceramic wash that will enhance the shine of the car

नागपूर : काही दिवसांपूर्वी बादलीत पाणी घेऊन पोछा मारण्यास कार धुणे असे समजले जायचे. मात्र, या धुण्यालाही आधुनिक स्वरूप देऊन दोन युवकांनी कार वॉशिंग सोबतच हायब्रीड सिरॅमिक वॉश' करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गाड्यांवरील रेषा, डाग जाऊन त्याची चकाकी वाढते.

‘गोवॉश’ नावाने या दोन युवकांनी स्टार्टअप सुरू केले आहे. त्यातून रोजगारनिर्मितीही ते करीत आहेत. कार वॉशिंग करण्याचा व्यवसाय तसा नवा नाही. पूर्वी ओमनी व्हॅनमध्ये प्रेशर वॉश, व्हॅक्युम क्लिनर आणि इतर साहित्याच्या समावेश असायचा. मात्र, यशवंत बुधवानी आणि आकाश आसवानी यांनी इलेक्ट्रिक व्हेईकलचा उपयोग केला आहे.

इलेक्ट्रिक व्हेईकल व्हॅनमध्ये असलेले सामान योग्यरीत्या ठेवून त्याद्वारे कार व दुचाकी वाहनाचे वॉशिंग करण्यात येते. इलेक्ट्रिक व्हेईकलमुळे ‘इकोफ्रेंडली’ कार वॉशिंग ही संकल्पनाही साकार करण्यास मदत होते. विशेष म्हणजे वॉशिंग करताना ‘हायब्रीड सिरॅमिक वॉश’ करण्यावर भर असतो. त्यामुळे वाहनही आकर्षक दिसेल.

वारंवार अशाप्रकारे वॉश केल्यास त्याची लेयर तयार होत छोट्या ‘स्क्रॅच' पडणार नाही. सहा महिन्यांपूर्वी यशवंत आणि आकाश यांनी हे ‘स्टार्टअप’ सुरू केले. यातून दहावर युवकांना त्यांनी रोजगार दिला आहे. काही दिवसांनी कार वॉशिंग करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर नोंदविता येणार आहे. हे ऑर्डर ग्राहकांना एक दिवसाअगोदर नोंदवावे लागणार आहे.

‘व्हीआयपी’ सेवा सुरू करणार

अनेकदा कामाच्या गडबडीत कार वॉश करण्याचे डोक्यातून निघून जाते. त्यामुळे कार वॉशिंग करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर नोंदविता येणे शक्य न झाल्यास अशा ग्राहकांसाठी ‘गोवॉश’द्वारे ‘व्हीआयपी’ सेवा देण्यात येणार आहे. त्यांना यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. याशिवाय वॉशिंगसाठी विविध पॅकेजही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com