कामचलाऊपणा खपवून घेणार नाही; सीईओ योगेश कुंभेजकर यांचा इशारा 

नीलेश डोये
Sunday, 25 October 2020

आयआयटीयन असलेल्या तरुण अधिकाऱ्याने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून योगेश कुंभेजकर यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला कार्यक्षम आणि पारदर्शी करण्याचा संकल्प सोडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.

नागपूर : जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही. एक दिवसात तुमचे काम झाले तर शपथ...अनेक अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्याचा मोठा आवाज झाला मात्र कारभार सुधारला नाही. आता नव्या दमाचे आणि आयआयटीयन असलेल्या तरुण अधिकाऱ्याने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून योगेश कुंभेजकर यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेला कार्यक्षम आणि पारदर्शी करण्याचा संकल्प सोडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न ः कोरोनाला कसे रोखले

कुंभेजकर ः विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी क्वारंटाइन असताना जिल्ह्याला अधिक जवळून समजून घेता आले. दोन प्रमुख तसेच ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत केलेल्या कामाचा अनुभव गाठीशी आला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कोरोनाला जिल्ह्यातील अनेक गावात शिरण्यापासून रोखता आले. नागरिकांचेही चांगले सहकार्य लाभले.

तुम्ही रात्री घरात येणाऱ्या हिरव्या किड्यांनी त्रस्त आहात; मग ही बातमी तुमच्यसाठीच

प्रश्न ः आस्थापनाच्या तक्रारी कशा दूर करणार

कुंभेजकर ः निवृत्त झालेल्यांना निवृत्तीनंतरच्या देयकासाठी चकरा माराव्या लागतात. हा प्रकार योग्य नाही. फाइलींची सद्यःस्थिती काय आहे, कोणत्या विभागाच्या टेबलावर याची माहिती करण्यासाठी यंत्रणा तयार करण्यात येईल. प्राथमिक स्तरावर टेबल सांभाळणाऱ्यावर जबाबदारी टाकण्यात येणार आहे. फाईल वेळेत निकाली निघावी. विभागप्रमुखांकडून आठवड्याला याची माहिती घेण्यात येईल. विनाकारण फाईल थांबविणाऱ्यांवर आवश्यक कारवाई करण्यात येईल.

प्रश्न ः कोरोनामुळे आलेल्या मर्यादा कशा दूर करणार

कुंभेजकर ः नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी कमी करण्यासाठी ऑनलाइन व्यवहारावर भर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी नागरिकांकडून ई-मेलवर प्रस्ताव, निवेदन, तक्रारी घेण्यात येतील. प्रत्येक ई-मेलला प्रतिसाद देण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुख, पंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांना करण्यात आल्यात. प्रतिसाद मिळाल्यास नागरिकांना त्यांचे कामांची दखल घेण्यात आल्याचे समजेल.

प्रश्न ः नियमबाह्य कामांचे काय

कुंभेजकर ः जिल्हा परिषदेचा कारभार अधिक पारदर्शी करण्यावर भर आहे. काही चुका अनवधानाने होतात. काही जण जाणूनबुजून लाभासाठी चुकीचे, नियमबाह्य काम करण्यात येते. मुद्दाम नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच पुढे अशा प्रकारची कारवाई होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.

बापरे बाप! .चोरट्यांनी केला चक्क वाइनशॉपीत डान्स; असे काय दिसले झाला इतका आनंद

प्रश्न ः कोरोनाची दुसरी लाट कशी रोखणार

कुंभेजकर ः प्रशासनाकडून पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. औषधांचा आवश्यक साठा आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे कोरोनासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच प्रमाणे काम करू इच्छित असलेल्यांची नावे गोळा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येत आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ignorance in work would be tolerated said CEO of ZP nagpur