जागतिक मार्गदर्शक म्हणून भारताने स्थान मिळवावे

India should be ranked as a global guide
India should be ranked as a global guide

नागपूर : प्रखर राष्ट्रवाद, मातृभूमीविषयी प्रेम, संपूर्ण समर्पण, सकारात्मक वैचारिक सामर्थ्य आणि प्रखर तर्कबुद्धी ही सावरकरांच्या जीवनाची पंचतत्त्वे आहेत. यांचा दिव्य स्पर्श चारही व्यवस्थांना होण्याची गरज आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व कौटुंबिक पातळीवर ही सावरकरांची पंचतत्त्वे अनुसरणारे, प्रसारित करणारे व त्यांचा आग्रह धरणारे सच्चे कार्यकर्ते तयार व्हायला हवे, असे मत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मानव विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील यांनी व्यक्त केले.


प्रोफेसर्स कॉलनी मित्र मंडळ, गृहिणी समाज व सार्वजनिक वाचनालय, हनुमाननगर यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी द्वितीय पुष्प गुंफताना "सावरकर काल, आज आणि उद्या' या विषयावर मोहरील बोलत होते. ते म्हणाले, सध्याच्या देशविकासाला चार महत्त्वाच्या व्यवस्था आधारभूत आहेत. मात्र, त्या विस्कळीत होत आहेत. यात राजकीय व्यवस्थेत पक्षापक्षांत वाढत्या प्रमाणामध्ये निर्माण होणारे वादविवाद व आरोप प्रत्यारोप होतात. तसेच सामाजिक वर्तुळांमध्ये एकविसाव्या शतकात जातीपातीच्या पलीकडचा समाज निर्माण व्हायला हवा. परंतु, अगदी विरोधातील गोष्टी घडताना दिसतात. जातीपातींचे जाहीरपणे केले जाणारे उल्लेख व त्यावरून एकमेकांवर केले जाणारे लांछन, हीदेखील चिंतेची बाब आहे.
सावरकरांना केला जाणारा विरोध पचविण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी. त्यांना होणाऱ्या विरोधाला विरोध करून सकारात्मक ऊर्जा वाया घालविण्यापेक्षा सावरकरांच्या पंचतत्त्वांना कसे स्थापित करता येईल, यासंदर्भात विचार प्रक्रिया सुरू होणे गरजेचे आहे. ते झाल्यास सावरकर आणि डॉ. अब्दुल कलाम यांना अपेक्षित जागतिक मार्गदर्शक म्हणून आपला देश स्थान प्राप्त करू शकतो. सावरकरांच्या जीवनातील पंचतत्त्वांचा भारतीय नागरिकांनी मनापासून स्वीकार करावा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक पराग पांढरीपांडे यांनी केले. डॉ. रागिणी क्षीरसागर यांनी वक्‍त्यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. आयोजनासाठी अरुंधती पांढरीपांडे, डॉ. यशवंत देशपांडे, राजेश किनारीवाला, प्रणव हळदे, ऋचा हळदे व संदीप तिजारे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com