एकीकडे कोरोना दुसरीकडे पूरपरिस्थिती; अशात कशी द्यायची जेईई? विद्यार्थ्यांसमोर गंभीर प्रश्न

JEE exam on how to give flood situation
JEE exam on how to give flood situation

नागपूर : नागपूर जिल्ह्यासह गडचिरोली, भंडारा आणि पूर्व विदर्भात पूरपरिस्थिती आहे. या प्रकाराने एकीकडे वाहतूक खोळंबली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी पुरात अडकले आहेत. त्यामुळे १ ते ६ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या जेईई मुख्य परीक्षा केंद्रावर पोहोचून परीक्षा द्यायची कशी, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे.

पूर्व विदर्भातील जवळपास ३० हजारांवर विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची वेळ आली आहे. देशात दरवर्षी दोनदा जेईई मेन परीक्षा होत असते. जानेवारीत यापूर्वी जेईई मेन परीक्षा घेण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्याचे ठरले होते.

मात्र, कोरोनामुळे परीक्षेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले. अनेक राज्यांनी परीक्षाच होऊ नये असा पवित्रा घेतला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत सरकारने जेईई परीक्षा घेण्याचे ठरवीत १ ते ६ सप्टेंबरदरम्यान परीक्षांचे देशभरात आयोजन करण्याचे ठरविले.

विदर्भासाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला हे परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा ही सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई मुख्य परीक्षेसाठी अर्ज केले आहेत.

या चारही जिल्ह्यांतील गावांना पुराने घेरले आहे. अशा स्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी कसे पोहोचावे, हा गंभीर प्रश्न उभा झाला आहे. त्यातच भंडारा आणि गोंदिया येथील विद्यार्थ्यांसाठी नागपूर हे एकमेव परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना एवढा लांबचा प्रवास करून परीक्षेसाठी पोहोचणे अडचणी आहे.

कोरोनाची परिस्थिती भीषण

नागपूरमध्ये असलेली कोरोनाची परिस्थिती बघता विद्यार्थ्यांमध्ये आधीच दहशतीचे वातावरण आहे. दररोज हजारावर रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे दोन वर्षांपासून या परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठे संकट ओढवले असून परीक्षा पुढे ढकलावी; अन्यथा मोठी अडचण निर्माण होईल, असे निवेदन शैक्षणिक कार्यकर्ता नीतेश बावनकर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com