हिंगण्याच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान, दिला गंभीर इशारा, कारण काय...

file
file

हिंगणा (जि.नागपूर) :  औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखला जाणारा हिंगणा तालुका कोरोनाचा "हॉटस्पॉट' होण्याकडे वाटचाल करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने याचा धसका घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज (ता. 14) स्थानिक तहसील कार्यालयात आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांचे कान टोचले. तालुक्‍यात आज कोरोना रुग्णांची संख्या 34 वर पोहोचली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाने पाय पसरल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

हेही वाचा : बॅंकवाले म्हणाले, स्वॉरी ! तो मॅसेज जुना होता !कर्ज देणार नाही, कारण काय तर हे.

आतापर्यंत34 कोरोनाबाधित
बैठकीला उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, तहसीलदार संतोष खांडरे, उपविभागीय अभियंता जे. के. राव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे, मुख्याधिकारी भारत नंदनवार, राहुल परिहार, नायब तहसीलदार महादेव दराडे, दर्शना सूर्यवंशी, ज्योती भोसले, मेश्राम उपस्थित होते.
हिंगणा तालुक्‍यात 13 जूनपर्यंत 32 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होते.

एमआयडीसीतून पोहोचला कोरोना एरणगावात
दोन गावांमध्ये 14 जून रोजी आणखी दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हे दोन्हीही रुग्ण डिगडोह परिसरातील लता मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी भरती होते. तिथे त्यांचे नमुने तपासणीकरिता एका खासगी लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. आज त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात डिगडोह ग्रामपंचायतअंतर्गत इंदिरामातानगरमधील 80 वर्षीय वृद्ध व दुसरा येरणगाव या खेडेगावातील एक 60 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे.

रूग्ण संख्या वाढणार नाही याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी
कोरोना "हॉटस्पॉट' ठरत असलेल्या हिंगणा तालुक्‍यात उपाययोजना कोणत्या सुरू आहेत, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बैठक घेतली. वानाडोंगरीतील कोविड सेंटर तातडीने कार्यान्वित करावे, वानाडोंगरी नगर परिषद व हिंगणा नगरपंचायतीने तातडीने घरोघरी सर्वेक्षण करावे, नागरिकांची गर्दी जास्त होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, हिंगणा ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यात यावी, यासह इतर सूचना दिल्या. रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्व अधिकाऱ्यांचे त्यांनी कान टोचले. कोरोना रुग्णसंख्या यापुढे वाढणार नाही, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिले. येरणगाव तालुका स्थळापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. ग्रामीण भागातही आता कोरोनाने पाय पसरल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रमिकनगर, दवलामेटी परिसरात 3 रुग्ण
वाडी : दवलामेटी व सोनेगावच्या श्रमिकनगर वॉर्डात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तहसील प्रशासन व आरोग्य पथकाला धावपळ करावी लागून रात्री नऊच्या सुमारास परिसर सील करण्याची कार्यवाही करावी लागली.एमआयडीसीतील एका कंपणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील श्रमिकनगर येथील 6 जनांना आरोग्य विभागाने संस्थागत क्‍वॉरंटाइन केले असता, रविवारी त्यापैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रात्री आठच्या सुमारास श्रमिकनगर येथे नागपूर ग्रामीण तहसीलदार मोहन टिकले, खंडविकासअधिकारी किरण कोव्हे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमके, व्याहाडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा धुर्वे आदींनी संपर्कातील 10 जणांना क्‍वारंटाइन करण्याची कार्यवाही केली. त्यांना रुग्णवाहिकेने नागपूरला पाठविण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांचीही मदत घेण्यात आली.येथील कार्यवाहीदरम्यान पथकातील काही अधिकारी डॉ. हेमके यांच्या नेतृत्वात दवलामेटी येथे रात्री दहाला पोहोचले. ग्रा. वि. अधिकारी विष्णू पोटभरे व अन्य सहकाऱ्यांनी कोरोनाबाधित आढळलेल्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णवाहिकेतून नागपूरला क्‍वारंटाइन करण्यासाठी रवाना केले. आठवा मैल परिसरातील रामजी आंबेडकरनगर वॉर्ड क्रमांक एक गल्ली सील करण्यात आली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com