वर्चस्वाचा वादातूनच झाला जीम ट्रेनरचा "गेम' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

रविवारी (ता. 12) रात्री साडेआठच्या सुमारास शहरातील नागमंदिराजवळ गुप्ता गॅरेजसमोर आरोपीने शहरातील जिम ट्रेनरची सत्तूरने सपासप वार करून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी नरेंद्र जयशंकर सिंग (वय 29, डब्ल्यूसीएल, वाघोडा) व मृत अंगद सिंग हे चांगले मित्र होते.

सावनेर (जि.नागपूर) :  दोन मित्रांतील वर्चस्वाच्या वादातूनच जिम ट्रेनर अंगद रवींद्र सिंग (वय 34, वेकोलि वाघोडा) याची हत्या करण्यात आली. सावनेर पोलिसांनी आरोपी नरेंद्र सिंग याला ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून आणखी एका सहआरोपीला अटक करण्यात आली. 

क्‍लिक करा : गृहमंत्र्यांचा मंत्र, आता विकासकामाला लागूया ! 

आरोपीची पोलिसांत शरणागती 
रविवारी (ता. 12) रात्री साडेआठच्या सुमारास शहरातील नागमंदिराजवळ गुप्ता गॅरेजसमोर आरोपीने शहरातील जिम ट्रेनरची सत्तूरने सपासप वार करून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी नरेंद्र जयशंकर सिंग (वय 29, डब्ल्यूसीएल, वाघोडा) व मृत अंगद सिंग हे चांगले मित्र होते. वर्चस्वाच्या कारणावरून त्यांच्यात वारंवार वाद व्हायचा. यातूनच रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास व्यवसायातून खटका उडाल्यामुळे रविवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुजरखेडी परिसरातील नागमंदिराजवळ आरोपी नरेंद्र सिंग याने सत्तूरने हल्ला करून अंगद सिंग याला गंभीर जखमी केले होते. अंगद सिंग पळून जात असताना आरोपीने त्याचा पाठलाग करून अंगदवर सत्तूरने सपासप वार केले होते. गंभीर जखमी अंगदला उपचारासाठी नागपूर येथे नेत असताना पाटणसावंगी परिसरात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत होते. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीचा 17 तारखेपर्यंत पीसीआर मिळविला आहे. पुढील तपास सावनेर पोलिस करीत आहेत. 
 
क्‍लिक करा : दोघांचा अपघाती मृत्यू, खुमारीवासींचे "रस्ताजाम' 

सीसीटीव्ही फुटेजवरून आणखी एक ताब्यात 
या प्रकरणात घटनेच्या दिवशी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नरेंद्रसिंग मध्यरात्री पोलिसांना शरण आला. सोमवारी आरोपीला कोर्टात हजर केले असता 17 तारखेपर्यंत पीसीआर मिळाल्याने याप्रकरणी गुन्ह्याचा तपास सुरू आहे. खून प्रकरणात वापरण्यात आलेला सत्तूर आणण्यासाठी व संपूर्ण घटनाक्रमात विकास बघोटिया हा आरोपी सोबत असल्याचा पोलिसांचा संशय बळावल्याने ठाणेदार अशोक कोळी यांनी सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे मिळताच या खून प्रकरणात विकास बघोटिया यास सोमवारी दुपारी अटक केली. प्रकरणात अजून किती आरोपींचा सहभाग आहे, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jim Trainer's "Game" Becomes Domination