आकाश मित्राला औषध देण्यासाठी परिसरात आला; मात्र, शुभमच्या मनात भूत शिरल्याने केले हे... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

आकाश व शुभममध्ये वाद खदखदत होता. याच कारणावरून मागील काही दिवसांपासून आकाशचे परिसरात येणे-जाणे वाढले होते. कोणत्या न कोणत्या कारणावरून तो परिसरात चकरा मारत होता. तसेच ये-जा करताना शुभमला सतत टोमणा मारत होता. ही गोष्ट शुभमला खटकत होती. यामुळे तो अधिकच चिडला होता. आकाशला धडा शिकवण्यासाठी तो धडपड करीत होता. 

नागपूर : तो नेहमी वसंतनगरात चकरा मारीत होता. विनाकारण फिरत असल्याचे अनेकदा त्याला बघितले होते. तो याच्या त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असायचा. सतत चकरा मरीत असल्याने त्याने एका महिलेशी मैत्री केली. तिच्याशी तो रोज बोलत असायचा. महिलेशी बोलण्यासाठी तो रोज नवीन कारण शोधत असायचा. एकेदिवशी आपल्या पत्नीशी बोलताना महिलेच्या पतीने बघितले. यामुळेच त्यांच्यात वाद झाला अन्‌ पुढील घटनाक्रम घडला... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी वसंतनगर निवासी आकाश सुरेश सहारे (वय 22) याने जयवंतनगर निवासी शुभम साखोरे याच्या पत्नीशी मैत्री ठेवून बोलचाल केली होती. तो आकाशच्या पत्नीशी बोलण्यासाठी नवीन नवीन कारण शोधत असायचा. तसेच परिसरात नेहमी फिरत राहत होता. ही बाब शुभमला समजताच त्याचे आकाशला डोकले. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. संतप्त झालेल्या शुभमने अजनी पोलिसांत आकाशविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आकाशवर गुन्हा नोंदविला होता.

हेही वाचा - भाजप आमदाराने वाढदिवसाला जमवली गर्दी, सर्व नियम तुडवले पायदळी

तेव्हापासून आकाश व शुभममध्ये वाद खदखदत होता. याच कारणावरून मागील काही दिवसांपासून आकाशचे परिसरात येणे-जाणे वाढले होते. कोणत्या न कोणत्या कारणावरून तो परिसरात चकरा मारत होता. तसेच ये-जा करताना शुभमला सतत टोमणा मारत होता. ही गोष्ट शुभमला खटकत होती. यामुळे तो अधिकच चिडला होता. आकाशला धडा शिकवण्यासाठी तो धडपड करीत होता. 

शनिवारी रात्री बाभुळखेडा परिसरात राहणारा आकाशचा मित्र प्रज्वल भुजाडे याला औषधाची आवश्‍यकता होती. आकाश त्याच्यासाठी औषध घेऊन परिसरात आला. आकाश परिसरात आल्याची माहिती मिळताच शुभमने वसंतनगर निवासी गणेश धावडे आणि चंद्रमणीनगर निवासी प्रफुल्ल बहादुरे यांना बोलावले. प्रज्वलकडे औषध सोपवून आकाश घरी जाण्यासाठी निघतच होता की, तिघांनीही त्याच्यावर हल्ला केला. लाथाबुक्‍क्‍यांनी त्याला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

चाकूने केले सपासप वार

अकाश आपल्या पत्नीशी बोलण्यासाठी परिसरात आला असावा असा समज शुभमला झाला. त्याने लगेच आपल्या दोन मित्रांना बोलावून घेतले. मात्र, आकाश आपल्या मित्राला औषध देऊन घरी परत जाण्यासाठी निघाला असता शुभमने आकाशच्या कान आणि गालावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून फरार झाला. आकाशला तत्काळ मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - या शहरातील मुस्लिम परिसर मनपाने केला 'सील', हे कारण ठरले कारणीभूत

आकाश, शुभमवर जुने गुन्हे दाखल

पत्नीशी बोलल्यावरून झालेल्या वादातून तिघांनी आकाशवर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर पथकासह घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून काही तासांतच गणेश आणि प्रफुल्लला अटक केली. रविवारी पोलिसांनी शुभमलाही अटक केली. आकाश आणि शुभम या दोघांवरही जुने गुन्हे नोंद आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knife attack on young man in Nagpur