धोका वाढला, मोमिनपुरा भागात डयुटीवर असलेला कामठीतील पोलिस कर्मचारीही पॉजिटिव्ह...

कामठी : भिलगावातील सील करण्यात आलेले श्रीहरीनगरी गोल्डी ले-आउट.
कामठी : भिलगावातील सील करण्यात आलेले श्रीहरीनगरी गोल्डी ले-आउट.

कामठी (जि.नागपूर) : जिल्हयाचा ग्रामीण भाग कोरोनापासून सुरक्षित असतानाच एक पोलिस कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह निघाल्याने खळबळ उडाली. भिलगावात नागपूर शहर पोलिस दलात कार्यरत पोलिस कर्मचारी लॉकडाउनदरम्यान मोमिनपुरा भागात कर्तव्यावर असताना कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने शनिवारी (ता. 17) त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत तहसीलदार अरविंद हिंगे, बीडीओ सचिन सूर्यवंशी कर्मचाऱ्यांसह भिलगावात दाखल झाले. रात्रीच कर्मचारी राहात असलेल्या भिलगावातील श्रीहरीनगरी या परिसराला सील केले.

दहा जणांना केले क्‍वारंटाइन
भिलगावातील श्रीहरीनगरी गोल्डी ले-आउट सील केल्यानंतर येथील 45 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. याकरिता खैरी, खसाळा, रनाळा, भिलगाव, लेंडेनगर येथील यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी फुलकर, गुमथी प्राथमिक आरोग्यकेंद्राचे डॉ. राहुल राऊत, आशा वर्कर्स यांच्यासह खैरी उपकेंद्राच्या आरोग्यसेविका सुनीता नेवारे, संगीता उमाठे, आरोग्यसेवक तुषार मून व आशा समन्वयक माकडे यांनी सर्वेक्षणात सक्रिय सहभाग घेतला. भिलगावात भेट देऊन परिवारासहित दहा जणांना नागपूर येथे क्वारंटाइन करण्यात आले आहे. मागील महिन्यात कामठी शहरातील नवीन कामठी परिसरात एक रुग्ण आढळून आला होता. त्याला क्वारंटाइन केले असता, त्याने कोरोनावर मात केल्यानंतर कामठी तालुका कोरोनामुक्त झाला होता. मात्र, तीन आठवड्यांनतर भिलगावात रुग्ण मिळाल्याने प्रशासनाने अधिकच खबरदारी घेतली आहे.

हेही वाचा : दुर्दैवी ! कर्जबाजारीपणाला त्रस्त झालेल्या शेतक-यांनी निवडला हा मार्ग...


सुचनांचे काटेकोर पालन करावे
खबरदारी म्हणून या भागात सील करण्यात आले. याकरिता यशोधरा पोलिस ठाणे, आरोग्य विभाग आणि पंचायत समिती इत्यादींनी समन्वय साधून उपाययोजना राबविणे सुरू केले आहे. प्रत्येकाने शासनाकडून व आरोग्य विभागाकडून येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
-अरविंद हिंगे
तहसीलदार, कामठी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com