ही तर विरोधकांची राजकीय नौटंकी; कृषी विधेयक शेतकरी हिताचे; डॉ. पोतदार यांचे मत

विजयकुमार राऊत 
Wednesday, 7 October 2020

भारतीय जनता पार्टी कळमेश्वर-ब्राम्हणी यांच्यावतीने ४ ऑक्टोबर रोजी कळमेश्वर बाजार चौकात कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ मोदी सरकारचे आभार मानले व विधेयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते़

कळमेश्वर (जि. नागपूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पारित केलेले तिन्ही कृषी विधेयक ऐतिहासिक क्रांतिकारी व शेतकरी हिताचे असून या विधेयकामुळे शेतकऱ्यांची समृध्दीच होणार असल्याचे मत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ़ राजीव पोतदार यांनी कळमेश्वर बाजार चौकात आयोजित आभार सभेत मांडले़

भारतीय जनता पार्टी कळमेश्वर-ब्राम्हणी यांच्यावतीने ४ ऑक्टोबर रोजी कळमेश्वर बाजार चौकात कृषी विधेयकाच्या समर्थनार्थ मोदी सरकारचे आभार मानले व विधेयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते़

अधिक माहितीसाठी - घरात स्मार्ट टीव्ही वापरताय? तर आत्ताच व्हा सावध, अन्यथा येणार डोक्याला हात लावायची वेळ

या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्यसभा खासदार डॉ़ विकास महात्मे होते़ प्रमुख पाहुणे भाजपा प्रदेश सदस्य डॉ़ राजीव पोतदार, जिल्हा महामंत्री इमेश्वर यावलकर, तालुका अध्यक्ष दिलीप धोटे, शहर अध्यक्ष धनराज देवके, नगराध्यक्षा स्मृती इखार, प्रकाश वरूळकर, महादेव इखार, अरविंद टाकळखेडे, हरिभाऊ शेंडे, वसंत केशरवाणी, मनोज शेंडे, ताराचंद्र बांबल, धनराज मंडलिक, प्रगती मंडळ, वर्षा कामडी, शितल सातपुते, योगिता घायवट, सविता नाथे, पराग कपाळे व अन्य मान्यवर उपस्थित होते़

डॉ़ पोतदार पुढे म्हणाले की, काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केले़ त्यांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले़ देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले़ ती काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवित आहे़ विरोधकांची ही राजकीय नौटंकी असून या कायद्यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होईल़ नवीन तंत्रज्ञानासह उत्पादकता वाढेल व दलालराज संपुष्टात येईल, असेही म्हणाले़ 

यावेळी डॉ़ विकास महात्मे म्हणाले की, कृषी विधेयक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून भविष्यात याचे चांगले परिणाम दिसून येणार आहे़ स्व. राजीव गांधी म्हणाले होते की, आम्ही १ रुपया पाठवतो, परंतु नागरिकांपर्यत १३ पैसेच पोहोचतात़ परंतु, किसान सन्मान योजनेतून प्रत्यक्ष पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे़ 

हेही वाचा - होण्यापूर्वीच ओळखता येईल मुख कर्करोग; नागपूरच्या तरुणाचे संशोधन

काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडा, असे म्हणाले़ याप्रसंगी जिल्हा महामंत्री इमेश्वर यावलकर, धनराज देवके, हरिभाऊ शेंडे, वसंत केशरवाणी आदींनी मार्गदर्शन केले़ कार्यक्रमाचे संचालन व आभार राकेश देशमुख यांनी मानले़

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krushi Vidheyak is benificial for farmers said doctor potdar