तंत्रनिकेतनमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकले; सेकंड शिफ्टसाठी प्लॅनमध्ये निधीची तरतूद होईना

मंगेश गोमासे 
Sunday, 10 January 2021

राज्यात २०१० ला पंचवार्षिक योजनेनुसार महाविद्यालयांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. सध्या राज्यात असलेल्या २५ तंत्रनिकेतन आणि दहा अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.

नागपूर ः राज्यातील शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या सेकंड शिफ्टमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या चार महिन्यांपासून थकले आहे. हे सर्व शिक्षक व कर्मचारी प्लॅनमधील असल्याने त्यासाठी निधीची तरतूद नसल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

राज्यात २०१० ला पंचवार्षिक योजनेनुसार महाविद्यालयांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. सध्या राज्यात असलेल्या २५ तंत्रनिकेतन आणि दहा अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. यापैकी जवळपास सर्वच तंत्रनिकेतन महाविद्यालयात सेंकड शिफ्ट तर सहा अभियांत्रिकी महाविद्यालयात सेंकड शिफ्टचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये जवळपास ६०० वर शिक्षक व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

यामधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार प्लॅनिंग कमिशनद्वारे प्लॅनमध्ये करण्यात येते. यासाठी केंद्राकडून निधी मिळत असतो. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून केंद्राद्वारे निधी मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचारी आणि शिक्षकांचे पगार थकले आहेत. त्यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे हाल होत असून आर्थिक गणित बिघडले आहे.

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

एकीकडे राज्यात सातव्या वेतन आयोगाच्या नावावर बऱ्याच प्रमाणात निधीची घोषणा करण्यात येत असताना, तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकीच्या शिक्षकांना सहा-सहा महिने पगारापासून वंचित ठेवण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. दुसरीकडे दर पाच वर्षांने प्लॅनमध्ये असलेल्या कर्मचारी आणि शिक्षकांना नॉन प्लॅनमध्ये टाकण्यात येते. मात्र, या कर्मचारी आणि शिक्षकांना अद्यापही त्यात समाविष्ट करण्यात आलेले नाही हे विशेष.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lecturers in polytechnic colleges are not getting salaries in Nagpur