हे नातेच आहे आगळे... प्रेमाने दूर सारला भाषेचा अडसर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

लव्ह मॅरेज करतानाही आधी कुटुंबाला प्राधान्य दिल्याने ममता यांनी आधीच सासरच्या कुटुंबाचे मन जिंकले होते. पंजाब चंडीगड येथील माहेर असलेल्या ममता जेव्हा नागपुरात आल्या, तेव्हा येथील भाषा, खाण्यापिण्याच्या पद्धती, राहणीमान या सर्वांसोबत जुळवून घ्यावे लागले. सासू रजनी खंते यांनीही ममता यांना मोठ्या मनाने स्वीकारत सर्वतोपरी मदत केली. मुलीला समजावून सांगावे तसे त्यांनी ममता यांना मराठीतच सगळे समजावून सांगितले.

नागपूर : चंडीगड येथून नागपूरला एक वर्षाच्या शैक्षणिक कोर्ससाठी आलेल्या ममता यांची ओळख अमोल खंते यांच्याशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही आपल्या कुटुंबाला विश्वा सात घेऊन दोन्हीकडल्या रीतिरिवाजाने लग्नगाठ बांधली. सासरी आल्यावर सर्वप्रथम भाषेची अडचण होती. ममता यांना मराठी येत नव्हती, तर सासूला केवळ मराठी भाषा समजत होती. अशा परिस्थितीतही ममता यांनी प्रेम आणि आदरभावाने सासरच्यांची मने जिंकण्यात यश मिळविले.

लव्ह मॅरेज करतानाही आधी कुटुंबाला प्राधान्य दिल्याने ममता यांनी आधीच सासरच्या कुटुंबाचे मन जिंकले होते. पंजाब चंडीगड येथील माहेर असलेल्या ममता जेव्हा नागपुरात आल्या, तेव्हा येथील भाषा, खाण्यापिण्याच्या पद्धती, राहणीमान या सर्वांसोबत जुळवून घ्यावे लागले. सासू रजनी खंते यांनीही ममता यांना मोठ्या मनाने स्वीकारत सर्वतोपरी मदत केली. मुलीला समजावून सांगावे तसे त्यांनी ममता यांना मराठीतच सगळे समजावून सांगितले. ममता यांना मराठी भाषा कळत नसली, तर मायेची भाषा कळली. हळूहळू त्यांनी खंते कुटुंबाला आपलेसे केले. लग्नापूर्वी ममता एका खासगी शाळेत शिक्षिकेची नोकरी करीत होत्या.

जाणून घ्या - मुलांना विकणारी 'सपना शूटर' आहे तरी कोण?
 

लग्नानंतर पतीसह घरगुती व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. ममता यांच्या लग्नाला आता 15 वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. या वर्षांत त्यांनी आपले शिक्षण, व्यवसाय आणि घराची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. ममता यांनी सासूच्या मदतीने मराठीवरही प्रभुत्व मिळविले आहे. ममता सुरुवातीपासूनच समजूतदार असल्याने, आम्हाला तिला कुटुंबात सामावून घेण्यात कुठलीही अडचण आली नाही. आमच्या कुटुंबातील चालीरीती, सण उत्सव अत्यंत उत्साहात साजरे करण्यावर ममताचा भर असतो. सर्व नातेवाइकांनाही तिने आपल्या स्वभावामुळे आपलेसे केल्याचे रजनी खंते यांनी सांगितले.

आमच्या नात्यात प्रेम व आदरभाव
सासू-सुनेच्या नात्यात आवश्यअक असणारे प्रेम व आदरभाव आमच्या नात्यात असल्यामुळेच आम्हाला प्रांत, भाषा या गोष्टींचा अडसर वाटला नाही. प्रेमाची भाषा सर्व भाषांच्या पलीकडची असल्याचा अनुभव मला सासू-सुनेच्या नात्यातून मिळाला आहे.
- ममता खंते, सून

क्लिक करा - Video : ए भाई, जरा देखके चलो, आगे ही नहीं पीछे भी... का आली असे म्हणण्याची वेळ?
 

स्वभावाने आमची मने जिंकली
ममता चंडीगडची असल्याने सुरुवातीला तिला मराठी भाषा बिलकुल कळत नव्हती. तरीही तिने आपल्या स्वभावाने आमची मने जिंकली. माझ्या घरातही तिने मुलीची कमी भरून काढत आम्हा सर्वांनाच आपलेसे केले आहे.
-रजनी खंते, सासू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: love beyond language in relation