esakal | भयंकर! वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Electricity kills six in Yavatmal district

विदर्भासह मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड व अन्य राज्यांत विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्‍यता अनेकदा हवामान विभागाकडून वर्तवन्यात आली होती.

भयंकर! वीज पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

sakal_logo
By
राजेश काळे

राळेगाव (जि. यवतमाळ) : उन्हाळा सुरू झाला असतानाही विदर्भात ढगाळी वातावरण कायम आहे. अधुनमधून हलक्‍या सरींचा पाऊस पडतच असतो. अशातच रविवारी रात्री पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्‍यातील गुजरी येथील शिवारात सोमवारी (ता. 30) उघडकीस आली. 

गुजरी शिवारातील अरुण गोंडे यांच्या शेतात निमगव्हान येथील गायी चारणारे काही दिवसांपासून मुक्कामी होते. रविवारी (ता. 29) सायंकाळी राळेगाव तसेच परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे रविवारी रात्री कधीतरी वीज पडून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. 

जाणून घ्या - तू मला आवडली, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव म्हणत करायचा हा प्रकार...

कुटुंबातील सगळेच सदस्य यात मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये चार माणसे व दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्या 50 गायी असून, एकाही गाईचा मृत्यू झाला नाही. शेतात असल्याने व कुटुंबातील सर्वच सदस्य या घटनेत मृत्युमुखी पडल्याने ही घटना दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी उघडकीस आली. सर्वच सदस्य या घटनेत मृत्युमुखी पडल्याने मृतांची नावे अद्याप समजलेली नाही. 

विदर्भासह मध्य भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड व अन्य राज्यांत विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाची शक्‍यता अनेकदा हवामान विभागाकडून वर्तवन्यात आली होती. विशेषत: पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये वादळाचा "ऑरेंज अलर्ट'ही देण्यात आला आहे. यानंतर पावसाने हजेरीही लावली होती. 

मागचा इशारा ठरला फोल

मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान विभागाने विदर्भात "रेड' व "ऑरेंज अलर्ट'चा इशारा देत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेला वादळी पावसाचा इशारा अपेक्षेप्रमाणे फोल ठरला. दिवसभर उन्हाचे चटके बसल्यानंतर सायंकाळी वादळ आले. परंतु, काही भागांत हलका शिडकावा करून शांत झाले होते. मात्र, रविवारी आलेला पाऊस सहा जणांसाठी मृत्यू घेऊन आला.