हृदयद्रावक! पैशासाठी पित्याच्या डोक्यावर सब्बलने वार करून हत्या; पाषाणहृदयी मुलाचे कृत्य

अनिल कांबळे 
Wednesday, 24 February 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख युसूफ यांना चार मुली व दोन मुले आहेत. आरोपी शेख युनूस हा सर्वांत मोठा मुलगा असून सर्वजण विवाहित असून आपापल्या घरी आहेत. आरोपी हा फॅब्रिकेशनच काम करतो.

नागपूर : घर विकल्यानंतर मिळालेल्या पैशाची मागणी करणाऱ्या मुलाने जन्मदात्या पित्यावर सब्बलने वार करीत खून केला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मद अली चौक, भालदारपुरा येथे घडली. शेख युसूफ मेहबूब बसीर (वय ७३, रा. मोहम्मद अली चौक) असे मृताचे नाव आहे. शेख युनूस शेख युसूफ (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख युसूफ यांना चार मुली व दोन मुले आहेत. आरोपी शेख युनूस हा सर्वांत मोठा मुलगा असून सर्वजण विवाहित असून आपापल्या घरी आहेत. आरोपी हा फॅब्रिकेशनच काम करतो. तो पूर्वी भुतिया दरवाजा परिसरात पत्नी व दोन मुलांसह भाड्याने राहात होता. पण, लॉकडाऊनमुळे तो बेरोजगार झाला. त्यामुळे त्याची आर्थिक स्थिती ढासळली. त्याची दया आल्याने वडीलाने त्याला आपल्या घरी बोलावले. चार महिन्यांपासून तो वडिलांसोबत राहात होता. वडील मजुरी करायचे. 

हेही वाचा - दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा कल कोणत्या शाखेकडे? शिक्षण मंडळाकडून कलमापन चाचणीबद्दल स्पष्टता...

भालदारपुरा चौकात त्यांचे वडिलोपार्जित घर असून वडिलांनी ते १० लाखात विकले होते. त्या घराच्या संपत्तीत आरोपी मुलाला वाटा हवा होता. त्यावरून त्यांच्यात दररोज भांडण सुरू होते. बुधवारी सकाळी ११.३० वाजता त्यांच्यात पुन्हा वाद झाला व आरोपीने रागात घरातील सब्बल वडिलांच्या डोक्यावर मारून खून केला. वडील जागीच कोसळले व त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी पोहचला ठाण्यात

वडिलांचा खून केल्यानंतर आरोपी शेख युनूस हा थेट गणेशपेठ पोलिस ठाण्यात पोहोचला.‘मी माझ्या बापाचा खून केला’ अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिस चक्रावले. त्यांना ते पटले नाही, म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शहानिशा केली असता घटना खरी निघाली. पोलिसांनी रुकसाना पठाण यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

धक्कादायक! पोहरादेवीत गर्दी जमवण्यासाठी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांना होतं टार्गेट; गर्दी...

‘अब्बूने दादा को मार डाला‘

शेख युनुसला पोलिस ठाण्यात बसवून ठेवले आणि पोलिस घटनास्थळावर पोचले. कुटुंबातील सर्व जण रडत होते. शेख युनुसची ११ वर्षाची मुलगी पोलिसांकडे आली. ‘मेरे अब्बुने दादाजी के सर पर रॉडसे जोर से मारा. फीर दादाजी मर गये’ अशी माहिती रडत तिने पोलिसांना दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man attacked and kill his father for money in Nagpur