
दरवर्षी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात होतात. मात्र, गेल्या वर्षी दहावीचा भुगोलाचा पेपर सुरू असतानाच कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरासरी गुण देण्याचा निर्णय घेत पेपर रद्द करण्यात आला.
नंदोरी (जि. वर्धा) : दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक राज्य मंडळाने नुकतेच जाहीर केले आहे. दहावी नंतर काय, विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेतील शिक्षणाकडे वळावे.यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची घेण्यात येणारी कलमापण चाचणी कधी होणार, याबद्दल अद्याप राज्य शिक्षण मंडळाकडून स्पष्टता नाही. त्यामुळे दहावी बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असतानाच कलमापण व अधिक्षमता चाचणी कधी होणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा मार्च महिन्यात होतात. मात्र, गेल्या वर्षी दहावीचा भुगोलाचा पेपर सुरू असतानाच कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरासरी गुण देण्याचा निर्णय घेत पेपर रद्द करण्यात आला. त्यानंतर कडक लाकडाउन घोषित करण्यात आले आणि राज्यात इतर व्यवसायासह शैक्षणिक चक्रही ठप्प झाले.
पटाच्या शेऱ्या-वाघ्याची काळ्या मातीत शाळा; शंकरपटावरील...
शाळा सत्रारंभ होऊन ही सुरू होऊ शकल्या नाहीत, असे असले तरी मुले ऑनलाइन शिक्षण घेत होती. मिशन बिगिन अंतर्गत 24 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले.सध्या शाळांत दहावी व बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू असले तरी कोविडने पुन्हा एकदा राज्यात नव्याने डोके वर काढले आणि काही जिल्ह्यांतील शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्यात. राज्य मंडळाने दहावी बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्य मंडळाकडून परीक्षेची तयारी सुरू आहे.एप्रिलमध्ये परीक्षेस प्रारंभ होणार असून दहावीची कलचाचणी परीक्षा कधी होणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. तर राज्य मंडळाने अद्याप कलचाचणी संदर्भात कुठलीही सूचना जारी न केल्याने कलचाचणी संदर्भात संभ्रमात आहेत.
नात्याला काळीमा : मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला...
सात क्षेत्रातील कल व क्षमतेचे मापन
कृषी, कला, मानव्यविद्या, वाणिज्य, ललितकला, आरोग्य व विज्ञान, तांत्रिक आणि गणवेषधारी सेवाबद्दल विद्यार्थ्यांचा ओढा व क्षमता कोणत्या क्षेत्राकडे आहे. हे दहावीच्या परीक्षेपूर्वी जाणून घेण्यात येते. त्यातून दहावी नंतरची दिशा ठरविण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत मिळते.
संपादन - अथर्व महांकाळ