शेजाऱ्याने केला १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; नागपूरच्या नरखेड तालुक्यातील घटना  

man misbehaved with a girl in nagpur district
man misbehaved with a girl in nagpur district

जलालखेडा (जि. नागपूर) :  नरखेड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र बेलोना येथील घटनेने पुन्हा माणुसकीला काळिमा फासण्याचे काम केले. गावात राहणारे कुटुंब मुलीला व मुलाला घरी सोडून कामाला गेले असता शेजारी राहणाऱ्या एका नराधमाने संधी साधत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. आई वडील कामावरून आल्यानंतर मुलीने सर्व हकीकत सांगितली असता पोलिसात तक्रार देण्यात आली.

नरखेड  तालुकांतर्गत श्रीक्षेत्र बेलोना येथे मध्यप्रदेशमधून १५ वर्षांपूर्वी आलेले कुटुंब वास्तव्य करीत आहे. या कुटुंबाची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे आई-वडील मुलीला आणि मुलाला घरी सोडून मिळेल त्या कामावर जातात. याचप्रमाणे दोघेही पती पत्नी हे मंगळवारला कामासाठी शेतात गेले होते. यावेळी त्यांची मोठी मुलगी व लहान मुलगा हे घरात होते. 

दुपारी मुलगी घराचे काम करीत होती तर तिचा लहान भाऊ हा बाहेर खेळासाठी गेला होता. याचीच संधी साधत शेजारी राहणाऱ्या प्रेमलाल रामचंद्र कळंबे या ३५ वर्षीय विवाहित नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीचं उघडकीस आले.   सदर मुलगी १३ वर्षाची असून अल्पवयीन आहे. स्वत:चे घरी एकटीचं असल्याची संधी बघून नराधमाने तिच्या घरात शिरून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

झालेल्या दुर्दैवी घटनेची माहिती सदर पिडीत मुलीने आई-वडील कामावरून परत आल्यानंतर त्यांना सांगितली. यानंतर सायंकाळी त्यांनी नरखेड पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली.    

याप्रकरणी वरून उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव यांचे नेत्रुत्वात ठाणेदार चंद्रकांत मदने व सहकाऱ्यांनी आरोपी विरोधात भादंवि कलम ३७६, ३७६(२)(l), ३७६(२)(j), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीला काल ( ता. १८ ) न्यायालयापुढे हजार केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com