शासकीय नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; नागपूरच्या सीताबर्डीतील घटना  

अनिल कांबळे
Thursday, 21 January 2021

निजाम सत्तार शेख (वय ४१ रा. योगी अरविंदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडित ३४ वर्षीय महिला सक्करदरा भागात राहाते. डिसेंबर २०१९मध्ये तिची निजाम याच्यासोबत ओळख झाली. निजाम याने तिला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. 

नागपूर ः शासकिय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका विवाहित महिलेवर सीताबर्डीतील लॉजमध्ये नेऊन बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा  - भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात, गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

निजाम सत्तार शेख (वय ४१ रा. योगी अरविंदनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडित ३४ वर्षीय महिला सक्करदरा भागात राहाते. डिसेंबर २०१९मध्ये तिची निजाम याच्यासोबत ओळख झाली. निजाम याने तिला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. 

नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने तिला सीताबर्डीतील शिवानी लॉज येथे नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने अनेक वेळा काही शासकीय कार्यालयात सोबत नेले. तिला नोकरी लावून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे भासवले. महिलेने वारंवार नोकरीबाबत त्याला विचारणा केली. मात्र तो वेळोवेळी वेगवेगळी उत्तरे देऊन टाळाटाळ करीत होता. 

हेही वाचा - अख्खं गाव हळहळलं! पत्नीवर अंत्यसंस्कार झाले अन् दुसऱ्याच दिवशी पतीनेही सोडला जीव

त्यानंतर तो तिला नेहमी ‘फक्त एकदा लॉजवर यावे लागेल’ असे सांगून वारंवार तिच्यावर बलात्कार करायला लागला. पीडित महिलेने सीताबर्डी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून निजाम याला अटक केली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man misbehaves with woman in Nagpur