
संतोष बालगीर हा तरुण एमएससी मॅथेमॅटिक्स असून पुण्यात ट्यूशन क्लासेस घेत होता. पुण्यातील वातावरणामुळे ऐतिहासिक स्थळांबाबत आवड निर्माण झाली.
नागपूर ः देशातील ऐतिहासिक स्थळांची दुर्दशा बघता ते वाचविण्याचा संदेश देण्यासाठी लातूर येथील एका तरुणाने सायकलने भारत भ्रमण सुरू केले. आतापर्यंत त्याने पाच हजार किमीचे अंतर पार करीत दक्षिण भारत पिंजून काढला. आज संतोष बालगीर हा चोवीस वर्षीय तरुण नागपुरातून उत्तरेकडे सायकलने रवाना झाला. नागपुरातही त्यांनी मेट्रो तयार करीत असलेल्या हेरिटेज वॉकची माहिती घेतली.
संतोष बालगीर हा तरुण एमएससी मॅथेमॅटिक्स असून पुण्यात ट्यूशन क्लासेस घेत होता. पुण्यातील वातावरणामुळे ऐतिहासिक स्थळांबाबत आवड निर्माण झाली. सायकल चालविण्याची आवड सुरवातीपासून होतीच. महाराष्ट्रातील गडकिल्ले, हेरिटेजला सायकलनेच भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्यांची दुर्दशा बघून ते वाचविण्यासाठी पुढाकार घेतला.
10th & 12th Board Preparation: विद्यार्थ्यांनो, तयार करा अभ्यासाचा प्रभावी टाइम टेबल; या आहेत...
केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातही ऐतिहासिक स्थळांचीही स्थिती अशीच असल्याने देशभर सायकलने फिरून ते वाचविण्याचा संदेश देण्याचा निर्धार केला, असे संतोष बालगीर यांनी सांगितले. तो काल नागपुरात आला होता. यावेळी त्याने मेट्रोभवनाला भेट दिली. त्यानंतर मेट्रो तयार करीत असलेल्या हेरिटेज वॉकचीही पाहणी केली.
आज सकाळी तो छिंदवाडा, जबलपूर, झांशीकडे सायकलने रवाना झाला. आतापर्यंत दक्षिण भारतातील कर्नाटक आदी राज्यातून फिरत पाच हजार किमीचे अंतर पार केले. आता तो मध्यप्रदेशातून दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास करणार आहे.
टेस्लानंतर इलॉन मस्क यांच्या Starlink कंपनीची भारतात दमदार एन्ट्री; देणार इंटरनेट सेवा
नागपूर मेट्रोचा घेतला आनंद
प्रवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक गडकिल्ले, हेरिटेजला भेट देणार असल्याचे संतोषने नमुद केले. नागपुरात प्रथमच मेट्रोमधून प्रवास करण्याची संधी मिळाल्याचा आनंद असल्याचेही तो म्हणाला. देशातील २० वर्ल्ड हेरिटेजला भेट देणार असल्याचेही तो म्हणाला.
संपादन - अथर्व महांकाळ