का आहे उपराजधानीत दुकानांचे शटर "डाऊन'...वाचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जून 2020

एका वस्तीत कमीत कमी पाच ते सहा कापड, स्टेशनरी, इलेक्‍ट्रिक साहित्य, कूलर आदीची दुकाने आहे. या 31 वस्त्यातील किमान हजार दुकानदारांना प्रतिबंधित क्षेत्राचा फटका बसला आहे.

नागपूर : सरकारने 5 जूनपासून शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूची संपूर्ण दुकाने सुरू आहेत. दुकाने सुरू झाल्याने अडीच महिने संयम पाळणाऱ्या ग्राहकांनी दुकानांमध्ये तुडूंब गर्दी केली. त्यामुळे दुकानदारांचे चेहरेही व्यवसायाने फुलले. परंतु त्याचवेळी शहरातील प्रतिबंधित करण्यात आलेल्या 31 परिसरातील दुकानदारांत (जीवनावश्‍यक वस्तु वगळून) निराशा दिसून येत आहे.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

लक्ष्मीनगर झोन येथील बजाजनगर, धरमपेठ झोनंतर्गत सदर, काटोल रोड, धंतोलीतील एसके बॅनर्जी मार्ग, हनुमाननगर झोनंमधील जवाहरनगर, ताजनगर, धंतोली झोनमधील वेणुवण हाऊसिंग सोसायटी, हावरापेठ, वसंतनगर रामेश्वरी रोड, अरविंद सोसायटी नरेंद्रनगर, चंद्रमणीनगर, नेहरुनगर झोनमधील न्यु नंदनवन, गोपाल कृष्णनगर, गाधीबाग झोनमधील मोमीनपुरा, बैरागीपुरा, बजेरिया नागेश्वर मंदिर, सिरसपेठ, इतवारी टांगा स्टॅन्ड, भुजाडे मोहल्ला, हत्तीनाला, गांधीबाग कपडा मार्केट, सतरंजीपुरा झोनमधीव बडी मशिद सतरंजीपुरा, तुलसीनगर, नाईक तलाव-बैरागीपुरा, तांडापेठ, स्विपर मोहल्ला, बिनाकी सोनारटोली, लकडगंज झोनमधील शिवाजी को-ऑप. हाऊ. सोसायटी हिरवीनगर, आशीनगर झोनमधील हबीबनगर, मेहबुबपुरा, संघर्षनगर, न्यु इंदोरा आणि मंगळवारी झोनमधील गड्डीगोदाम, शबरी मातानगर गोरेवाडा या वस्त्या प्रतिबंधित क्षेत्र आहे.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच! 

परिणामी येथे जीवनावश्‍यक वस्तु वगळता इतर दुकाने उघडण्यास निर्बंध आहेत. एका वस्तीत कमीत कमी पाच ते सहा कापड, स्टेशनरी, इलेक्‍ट्रिक साहित्य, कूलर आदीची दुकाने आहे. या 31 वस्त्यातील किमान हजार दुकानदारांना प्रतिबंधित क्षेत्राचा फटका बसला आहे. शासनाने व्यवसाय चक्र सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ही दुकाने सुरू करण्यासाठी कुठे 15 दिवस तर कुठे महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या दुकानदारांचा तोंडचा घास कोरोनाने हिरावल्याचे चित्र आहे. 

"अनलॉक'मुळे शहरातील अनेक दुकाने सुरू झाली असून गर्दीमुळे दुकानदारांचे चेहरे फुलले. परंतु अनलॉक झाले अन्‌ नेमके त्याचवेळी कोरोनाबाधित आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यामुळे हजारो दुकानदारांचे शटर "डाऊन'च आहेत. परिणामी अडीच महिन्यानंतर आलेली व्यवसायची संधी आणखी लांबणीवर गेली. 

शहरात दररोज नवनव्या क्षेत्रात कोरोनाबाधित आढळून येत आहे. त्यामुळे आयुक्तांकडून संबंधित कोरोनाबाधिताचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे. या क्षेत्रात जीवनावश्‍यक वस्तुंच्या दुकानांना परवानगी आहे. परंतु इतर कापड, इलेक्‍ट्रिक, स्टेशनरी आदी दुकाने बंद करण्यात आली आहे.

अनलॉक झाले अन्‌ प्रतिबंधित क्षेत्रही घटले 
लॉकडाऊनमध्ये दुकानदारांना शिथिलता दिली अन्‌ शहरातील 11 क्षेत्रातील निर्बंध हटविण्याचा योगायोग आल्याने या क्षेत्रातील दुकानदारांना दुकाने उघडण्याची संधी मिळाली. यात वादग्रस्त ट्रस्ट ले-आऊट, पांढराबोडी, काशीनगर टेकाडे हायस्कूल, पार्वतीनगर, जयभीमनगर, भालदारपुरा, लालगंज, दलालपुरा, शांतीनगर, संगमनगर, राजीव गांधीनगर, गौतमनगर, कुशीनगरचा समावेश असून येथील दुकानदार थोडक्‍यात वाचले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: many shops in nagpur still closed