२२ गुन्ह्यांचा मास्टरमाइंड ‘वॉंटेड’ला अटक, हवाल्याची लुटली रक्कम

अनिल कांबळे
Wednesday, 16 September 2020

अब्दूल लतिफ  गेल्या चार वर्षांपासून नागपूर पोलिसांना वॉंटेड होता. पोलिसांना गुंगार देऊन त्याने मराठवाड्यात गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या होत्या. शाहरातील सर्वात मोठी दारू आणि गांजा तस्कर चंदा ठाकूरशी त्याचे घट्ट मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तो चंदासाठी दारू आणि गांजा तस्करी करीत होता.

नागपूर  ः ड्रग्स तस्करी, लाखोंची खंडणी, अपहरण, लुटमार आणि दंगल घडविण्यासारखे तब्बल २२ गुन्हे दाखल असलेल्या ‘वॉंटेड’ आरोपीला सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करण्यात आली. अब्दूल लतीफ अब्दूल रज्जाक (बांगडे प्लॉट, शांतीनगर) असे कुख्यात आरोपीचे नाव आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम यांच्या पथकाने केली.

अब्दूल लतिफ  गेल्या चार वर्षांपासून नागपूर पोलिसांना वॉंटेड होता. पोलिसांना गुंगार देऊन त्याने मराठवाड्यात गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या होत्या. शाहरातील सर्वात मोठी दारू आणि गांजा तस्कर चंदा ठाकूरशी त्याचे घट्ट मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे तो चंदासाठी दारू आणि गांजा तस्करी करीत होता. २०१७ मध्ये ड्रग्स तस्करी करताना एनडीपीएसने अटक केली होती. तेव्हापासून तो नागपुरातून फरार झाला होता. 

महत्त्वाची बातमी - अत्यंत दुर्दैवी! रिमझिम पावसात खेळण्याचा तिला आवरला नाही मोह आणि घडली हृदयद्रावक घटना
 

दोन दिवसांपूर्वीच अब्दूल शहरात आला. ही गुप्त माहिती युनिट चारचे पीआय मेश्राम यांना मिळाली. दुपारी बारा वाजता शांतीनगरातील मुदलीयार ले-आउटमध्ये छापा घातला. पोलिसांना पाहून अब्दूल पळायला लागला. त्याचा पोलिसांनी पाठलाग केला. त्याला सिनेस्टाईल अटक केली. त्याने लपविलेला कोयता जप्त करण्यात आला. तसेच कारही जप्त करण्यात आली. ती कार एका पोलिस कर्मचाऱ्याची असल्याची चर्चा आहे. ही कारवाई उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात युनिट चारचे प्रमुख अशोक मेश्राम, एपीआय किरण चौगुले, आशिष क्षीरसागर, सचिन तुमसरे आणि दीपक झाडे यांनी केली.
 

लुटली हवाल्याची रक्कम

अब्दूलने लातूरमध्ये शहरात गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. एका मोठ्या व्यापाऱ्याने हवाल्याची चार कोटींची रक्कम गोडावूनमध्ये ठेदली होती. अब्दूलने १० साथीदारांची तोतया पोलिसांची टीम तयार केली. त्यांच्या मदतीने गोडावूनवर छापा घातला. व्यापाऱ्याचे अपहरण केले. ती रक्‍कम हडपली. तसेच खंडणीही मागितली.

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mastermind arrested for 22 offenses, action taken by Crime Branch