नागपूर मनपात कोण आहे शेरास सव्वाशेर?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 मे 2020

कोरोनाच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांमुळे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर सोशल मीडियातून स्तुतिसुमने उधळली जात आहे. सत्ताधारी पक्षातील एका पदाधिकाऱ्यानेही त्यांच्या कामाचे कौतुक केले. मात्र, मुंढे यांच्या बेधडक कार्यप्रणालीमुळे सत्ताधारी चांगलेच नाराज आहेत.

नागपूर : कोरोनाच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांमुळे नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर सोशल मीडियातून स्तुतिसुमने उधळली जात आहे. सत्ताधारी पक्षातील एका पदाधिकाऱ्यानेही त्यांच्या कामाचे कौतुक केले. मात्र, मुंढे यांच्या बेधडक कार्यप्रणालीमुळे सत्ताधारी चांगलेच नाराज आहेत.

नागपुरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा रोज वाढत आहे. त्यामुळे आयुक्त रोज नवीन निर्णय घेत आहे. हे निर्णय संभ्रम निर्माण करतात, यामुळे महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्तांविरुद्धचा बंडाचे निशाण फडकविल्याचे समजते. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आदेश काढल्यानंतर त्याची माहिती पदाधिकाऱ्यांना देण्याचेही सौजन्य दाखवीत नाही, असा आरोप आहे. महापौर संदीप जोशी यांनी कोव्हिड संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत याचा चांगलाच समाचार घेतला. यापुढे पदाधिकाऱ्यांना कमी लेखण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असाही इशारा त्यांनी आयुक्तांना दिल्याचे समजते.

वाचा - लॉकडाऊनच्या काळात वाढल्या तक्रारी, मग मद्यविक्री दुकानदारांना बसला हा फटका

मुंढे रोज नवनवे आदेश काढतात. रात्री दुकाने उघडायला सांगतात, सकाळी बंद करायला लावतात. आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्राबाहेर कुठले दुकाने उघडे ठेवायचे, कुठले बंद राहतील, याचा सविस्तर आदेश काढला होता. त्यांना दिवसही ठरवून दिले होते. त्यानुसार, दुसऱ्या दिवशी दुकाने उघडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्राबाबतही असेच प्रकार सुरू आहे. जिथे कोरोनाचा लॉकाडाउनचा कालावधी संपला असताना ते कायम ठेवले. आता 14 दिवसांचा नियम नाही, असे ते सांगत आहे. भाजी बाजाराबाबत रोज नव्या जागा घोषिच केल्या जात आहे. बाजार उघडेपर्यंत त्याची माहिती दुकानदारांनाही नसते आणि नागरिकांनाही. त्यामुळे नागरिक पदाधिकारी, नगरसेवकांना फोन करतात. मुंढे यांनी काय आदेश काढले, याची माहिती लोकप्रतिनिधींनासुद्धा नसते. पदाधिकाऱ्यांना कोरोनासंदर्भात माहिती देऊ नका, असे तोंडी आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे महापौरांनी प्रशासनाला चांगलेच खडसावले. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayur Joshi upset over order which create Confusion