नागपूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ‘मेकॅट्रॉनिक्स' अभ्यासक्रम; उद्योगांमध्ये येणार कामी; राज्यातील पहिलेच महाविद्यालय

mechatronics course introduced in government engineering college
mechatronics course introduced in government engineering college

नागपूर : उद्योगात मशीनयुग आल्याने सातत्याने नवे तंत्रज्ञान येत आहे. यासाठी अपडेट आणि कुशल मनुष्यबळाची लागणारी गरज लक्षात घेता शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात उद्योगांमध्ये आवश्यक असलेल्या ‘मेकॅट्रॉनिक्स' अभ्यासक्रमास नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवात होत आहे. हा अभ्यासक्रम सुरू करणारे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय हे राज्यात पहिलेच आहे.

गेल्या काही वर्षात अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निकमध्ये रिक्त जागा वाढल्या आहेत. अभ्यासक्रम आणि नोकरीमधील कमी होत असलेल्या संधी यामुळेच गेल्या काही वर्षात हे चित्र समोर आले आहे. दुसरीकडे उद्योगामधील तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. कंपनीमध्ये होणारे उत्पादन आणि स्वयंचलित प्रक्रिया डिझाइन, बांधकाम आणि चालविण्यासाठी अभियंत्यांची भरती करण्यात उद्योगांना आवश्यक कौशल्याची गरज पडत असते. ते कौशल्य देण्याच्या अनुषंगाने शासकीय तंत्रनिकेतन बऱ्याच प्रमाणात काम करीत आहे. 

यातूनच ‘मेकॅट्रॉनिक्स' सारखा अभ्यासक्रम तयार केला आहे. तीन वर्षीय पदविका अभ्यासक्रमात मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकला, संगणकशास्त्र आदी विषयाचा समावेश करण्यात आला आहे.

महाविद्यालयाने अभ्यासक्रम तयार करीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी पाठविला. अभ्यासक्रम या अभ्यासक्रमाला विभागाची मान्यता मिळताच अखिल भारतीय तंत्रनिकेतन परिषदेकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले. अभ्यासक्रमाला मान्यता मिळताच तो नव्या सत्रापासून सुरुवात करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाने विद्यार्थ्यांसाठी उद्योगाची दारे उघडी करुन देण्याचा प्रयत्न शासकीय तंत्रनिकेतन करीत आहे.

शासकीय पॉलिटेक्निक, नागपूर यांनी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून मेकाट्रॉनिकमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू केला हे पाहून आनंद झाला. मला खात्री आहे की हे बहुकौशल्य असलेल्या अभियंत्यांची औद्योगिक मागणीची आवश्यकता दर्शवेल आणि पूर्ण करेल.
-सुधीर पाठक, 
अध्यक्ष, अभ्यास मंडळ, शासकीय तंत्रनिकेतन नागपूर व माजी वरिष्ठ उपाध्यक्ष (उत्पादन )महिंद्रा अँड महिंद्रा

एआयसीटीईने अलीकडेच संस्थेला हा डिप्लोमा सुरू करण्यासाठी मंजूरी दिली आहे. उद्योग संस्थेला स्वयंचलित प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले नवीन तंत्रज्ञान मल्टि डिसिप्लिनरी अभियांत्रिकी डिप्लोमा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. हा अभ्यासक्रम उद्योगास उपयुक्त ठरेल. सध्या ३० जागांसाठी प्रवेश घेता येणार आहे.
-दिपक कुलकर्णी, 
प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, सदर.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com