साडेसहा महिन्यांनंतर धावणार मेट्रो; तिकीट दरात पन्नास टक्के सूट

राजेश प्रायकर
Friday, 16 October 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वे तसेच स्टेशनवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहे. तिकीट खिडकीजवळ सोशल डिस्टन्सिंगसाठी उभे राहण्यासाठी बॉक्स तयार करण्यात आले आहे. लिफ्टच्या बटणला हात न लावता टुथपिक किंवा टिश्‍यू पेपरचा वापर बंधनकारक आहे.

नागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे गेल्या साडेसहा महिन्यांपासून बंद मेट्रो शुक्रवारपासून सुरू होत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोने तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूरकरांना ५ ते २० रुपयांत मेट्रोतून प्रवास शक्य होणार आहे. शुक्रवारपासून हिंगणा मार्गावरील तर रविवारपासून वर्धा मार्गावरील मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे ऑपरेशन ॲन्ड मेन्टेनन्सचे महाव्यवस्थापक सुधाकर वराडे यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर २२ मार्चपासून मेट्रो सेवा बंद करण्यात आली होती. हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सिताबर्डी सकाळी आठ ते रात्री आठवाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू होत आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी मेट्रो सुविधेचा लाभ घ्यावा, यासाठी तिकीट दरात सवलत देण्यात येणार असल्याचे वराडे यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. सहा किमीपर्यंत १० रुपये दर होते. आता केवळ पाच रुपये करण्यात आले. १२ किमीपर्यंत २० रुपये दर होते. हे दर दहा रुपये करण्यात आले. १२ किमीवर मेट्रो प्रवासाचे दर ३० रुपये होते, ते २० रुपये करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वे तसेच स्टेशनवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहे. तिकीट खिडकीजवळ सोशल डिस्टन्सिंगसाठी उभे राहण्यासाठी बॉक्स तयार करण्यात आले आहे. लिफ्टच्या बटणला हात न लावता टुथपिक किंवा टिश्‍यू पेपरचा वापर बंधनकारक आहे.

तिकीट विक्रीतून येणारे पैसे अल्ट्रा व्हायोलेट रेजमधून सॅनिटायईज केले जातील. नागरिकांनी तिकिटांसाठी मेट्रोच्या महामेट्रो मोबाईलचा किंवा महाकार्डचा वापर करावा, असे आवाहन वराडे यांनी केले. थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिमीटर आदी सुविधा नागरिकांच्या तपासणीसाठी आहेत. प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले असून स्टेशनवर सॅनिटायझरची सुविधा असल्याचेही वराडे यांनी सांगितले.

ठळक बातमी - ‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता’, असे चिठ्ठीत लिहून पुण्यातील अभियंत्याची आत्महत्या

मेट्रो प्रवासासाठी अटी

  • ३८ अंश तापमान असलेल्यांना प्रवेश नाही
  • सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास असलेल्यांना प्रवेश नाही
  • मास्क बंधनकारक

तिकिटचे दर

अंतर (किमी) प्रचलित दर सवलतीचे दर
० ते ६ १० रुपये ५ रुपये
६ ते १२ २० रुपये १० रुपये
१२ पेक्षा जास्त ३० रुपये २० रुपये

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro to run after six and a half months