प्लेसमेंटची हुकली संधी, ही आहेत कारणे...

Missed placement opportunity .... what is the reason .... read
Missed placement opportunity .... what is the reason .... read

नागपूर  : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील टाळेबंदीमुळे महाविद्यालये बंद आहेत. यामुळे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना मे-जून महिन्यात मिळणाऱ्या "प्लेसमेंट'ची संधी हुकली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी राज्यात जवळपास 91 हजार 217 विद्यार्थ्यांचे "प्लेसमेंट' झाले होते.

राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांची 10 हजार 987 महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातून अभियांत्रिकी, व्यवस्थापन, आर्किटेक्‍चर, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, एमसीए, हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम चालवले जातात. राज्यात 14 विद्यापीठांत व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 83 हजार 937 एवढी आहे. दरवर्षी डिसेंबरपासून विविध कंपन्यांच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील विद्यार्थ्यांसाठी "प्लेसमेंट' शिबिराचे आयोजन केले जाते. तर मे आणि जून महिन्यात या विद्यार्थ्यांना कंपन्यांमध्ये सामावून घेतले जाते.

यंदा कोरोनाचा प्रादुर्भावाने राज्यासह देशभरात टाळेबंदी घोषीत करण्यात आली. ही टाळेबंदी अद्यापही कायम आहे. मात्र, काही प्रमाणात उद्योग सुरू असले तरी, देशातील आर्थिक मंदीचा फटका कंपन्यांना बसला असून अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले आहे. अशा परिस्थितीत नव्या कर्मचाऱ्यांचे "प्लेसमेंट' कशी काय होणार? हा प्रश्‍न आहे.
विशेष म्हणजे राज्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना कंपन्यांनी ऑफर लेटर देऊनही विद्यार्थ्यांना जॉईन करुन घेतले नाही. नागपूर विभागातून दरवर्षी चार ते पाच हजारावर विद्यार्थ्यांचे विविध कंपन्यांमध्ये "प्लेसमेंट' होते.

इंटर्नशिपवरही परिणाम

महाविद्यालयांद्वारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये "इंटर्नशिप'साठी पाठवले जाते. तो अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. मात्र, कोरोनामुळे महाविद्यालये आणि कंपन्या हे दोन्ही बंद असल्याने विद्यार्थ्यांना "इंटर्नशिप'साठी जाताच आले नाही. याचा फटका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. आता राज्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्याने अडचणींत भर पडली आहे.

कोरोनामुळे "प्लेसमेंट' आणि "इंटर्नशिप'च्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक कंपन्यांनी ऑफर लेटर देऊनही जॉईन करुन घेतले नाही. विशेषत: आयटी कंपन्यांनी ज्यांना जॉईन करुन घेतले त्यांना "वर्क फ्रॉम होम' तत्वावर काम करण्यास सांगितले आहे.
- डॉ. प्रशांत कडू, प्राचार्य
आभा-गायकवावाड पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय.

अंतिम वर्षाचे विद्यार्थी - राज्य - 2,83,937
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ - 30,000
    
तीन वर्षांमधील "प्लेसमेंट'
2016-17 - 79,235
2017-18 - 81,198
2018-19 - 91,217
2019-20 - अद्याप नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com